वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:17 AM2021-02-08T04:17:04+5:302021-02-08T04:17:04+5:30

सस्ती वीज उपकेंद्राच्या कनिष्ठ अभियंता यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात आली, परंतु लाखोंची वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात ...

Order to take action against the power thief | वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश

वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश

Next

सस्ती वीज उपकेंद्राच्या कनिष्ठ अभियंता यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात आली, परंतु लाखोंची वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. कनिष्ठ अभियंता व वीजचोरी करणारे यांची मिलीभगत असल्याने, कारवाई केली जात नसल्याचा आरोप कोटेशन भरून कनेक्शन घेतलेल्या शेतकऱ्यांकडून होत आहे. दर महिन्याला ५०० द्या आणि २४ तास वीज वापरा, असा सल्ला वीज वितरण विभागाकडून वीजचोरांना दिला जात आहे. त्यामुळे रात्रंदिवस सर्रास लाखोंची वीजचोरी होत असल्याचे दिसून येत आहे. कनिष्ठ अभियंत्याला वरिष्ठांचे पाठबळ असल्याचाही आरोप होत आहे. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित करताच, महावितरण विभाग खडबडून जागा झाला आणि विचोरी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशावरून कनिष्ठ अभियंता काय कारवाई करतात, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Order to take action against the power thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.