तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; साेशल ऑडिटची हाेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:43 AM2020-12-17T04:43:59+5:302020-12-17T04:43:59+5:30
मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालवधीत शहरात प्रशस्त सिमेंट रस्त्यांचे निर्माण करण्यात आले. रस्ता तयार केल्यानंतर अवघ्या पाच ...
मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालवधीत शहरात प्रशस्त सिमेंट रस्त्यांचे निर्माण करण्यात आले. रस्ता तयार केल्यानंतर अवघ्या पाच ते सहा महिन्यातच चार सिमेंट रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले. याप्रकाराची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी रस्ते तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत साेशल ऑडिट केले. ऑडिटमध्ये रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे समाेर आल्यानंतर याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले हाेते. तसेच जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनीसुद्धा मनपाला कारवाईचे निर्देश दिले हाेते. त्यानुषंगाने आयुक्त संजय कापडणीस यांनी हा विषय सभागृहात मांडला. परंतु सखाेल तपासणीच्या सबबीखाली नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’मार्फत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील दाेन वर्षांपासून आजपर्यंत ‘व्हीएनआयटी’ने तपासणीचा अहवाल सादर केला नसल्याचा आराेप करीत बुधवारी आम आदमी पक्षाने मनपाच्या सर्वसाधारण सभेत निवेदन देण्याचा प्रयत्न केला.
निवेदन नाकारले; प्रवेशद्वारासमाेर हाेळी
मनपात सभा सुरू असल्यामुळे प्रशासनासह सत्तापक्षाने निवेदन स्वीकारले नाही. त्यामुळे महानगर संयोजक प्रा.खंडेराव दाभाडे, महानगर सह संयोजक संदीप जोशी, जिल्हा संयोजक अरविंद कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकूरदास चौधरी, सचिन गणगणे, काजी लायक अली, नारायण बोरकर,अ. हमीद, सै. जहीर, कुणाल शर्मा, जुबेद खान, आवेज खान, आशिष शर्मा, सोनू शिरसाट आदी कार्यकर्त्यांनी मनपाच्या प्रवेशद्वारासमाेर साेशल ऑडिटच्या अहवालाची हाेळी केली.
....फाेटाे, टाेलेजी....