पोलीस अधीक्षकांच्या बदलीचा आदेश धडकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 11:33 AM2020-03-04T11:33:37+5:302020-03-04T11:36:21+5:30

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदलीचे आदेश दिले होते.

Order of Transfer of Police Superintendent's received | पोलीस अधीक्षकांच्या बदलीचा आदेश धडकला!

पोलीस अधीक्षकांच्या बदलीचा आदेश धडकला!

Next
ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातून ३५ महिला, युवती बेपत्ता असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली होती.गृह खात्याने अकोला पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना जबाबदार धरीत त्यांची तडकाफडकी बदली केली.बदलीचे आदेश धडकले असून, नवीन एसपींची मात्र अद्यापही प्रतीक्षाच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांची तक्रार न घेता त्यांनाच त्रास दिल्यानंतर या पालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेताच खडबडून जागा झालेल्या गृह खात्याने अकोला पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना जबाबदार धरीत त्यांची तडकाफडकी बदली केली. त्यानंतर मंगळवारी पोलीस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश धडकले असून, नवीन एसपींची मात्र अद्यापही प्रतीक्षाच आहे.
शहरात राहणाऱ्या एका पालकाच्या तक्रारीनुसार, त्यांच्या अल्पवयीन मुलीला पवन प्रमोद नगरे, अलका नगरे यांनी फूस लावून पळवून नेले.
या प्रकरणात संबंधित पालकाने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रार नोंदविल्यावरही मुलीचा शोध घेतला नाही, तसेच पोलिसांना आरोपींची नावे दिल्यानंतरही पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. पोलीस अधीक्षक, ठाणेदारांकडेसुद्धा सातत्याने तक्रार केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कंटाळून पालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून कारवाईची मागणी केली होती.
याचिकेवर सुनावणी करताना, दोन महिन्यात अकोला जिल्ह्यातून ३५ महिला, युवती बेपत्ता असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली होती. न्यायालयाने पोलिसांना बेपत्ता मुलीला हजर करण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही, त्यामुळे न्यायालयाने पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना समन्स बजावला होता. त्यानंतरही पोलीस अधीक्षक गावकर न्यायालयात हजर झाले नाहीत. एकंदरीतच प्रकरणात पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकाने केला होता. त्यानंतर या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदलीचे आदेश दिले होते, तसेच सिव्हिल लाइनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी, महिला तपास अधिकारी पीएसआय कराळे यांना निलंबित करण्यात आले होते.


पोलीस अधीक्षक पदासाठी यांच्या नावाची चर्चा
पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नितीन लोहार, निकेश खाटमोडे पाटील यांच्यासह आणखी दोन नावांची चर्चा सुरू आहे. एसपींच्या बदलीचे आदेश धडकले असले तरी नवीन एसपींचे नाव अद्यापही स्पष्ट झाले नाही. गंभीर प्रकरणाचे तपास तसेच अनेक महत्त्वाचे बंदोबस्तही सध्या रखडल्याचे वास्तव आहे.

Web Title: Order of Transfer of Police Superintendent's received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.