मूर्तिजापुरात महामार्गाच्या दोन्ही बाजूला साइडपट्ट्यांसह रुंदीकरण करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:15 AM2021-01-02T04:15:55+5:302021-01-02T04:15:55+5:30
मूर्तिजापूर शहरातून महामार्ग गेलेला असून, या राेडच्या दाेन्ही बाजूला साइडपट्ट्या नसल्याने अपघात हाेत आहेत. हाॅटेल काेहिनूर ते हाॅटेल व्यासदरम्यान ...
मूर्तिजापूर शहरातून महामार्ग गेलेला असून, या राेडच्या दाेन्ही बाजूला साइडपट्ट्या नसल्याने अपघात हाेत आहेत. हाॅटेल काेहिनूर ते हाॅटेल व्यासदरम्यान साइडपट्ट्या करून रुंदीकरण करण्याचे आदेशात म्हटले आहे. माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी यासंदर्भात शासनाच्या निदर्शनास आणून दिले हाेते. याबाबतचे निवेदन त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री बच्चू कडू, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना देऊन समस्या साेडविण्याची मागणी केली हाेती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी याबाबीची दखल घेत महामार्गाच्या दोन्ही बाजूला साइडपट्ट्यांसह रुंदीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. साइडपट्ट्या नसल्याने झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावे लागले. संबंधित काम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
.......................
अपघातांचे प्रमाण हाेणार कमी
महामार्गावर साइडपट्टे नसल्यामुळे अनेक अपघात घडत हाेते. हे काम त्वरित झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी हाेण्यास मदत हाेईल.
..............................
मूर्तिजापूर शहरातून गेलेल्या महामार्गाच्या दाेन्ही बाजूला साइडपट्ट्या नसल्याने अपघात वाढले. याबाबत समस्येचा पाठपुरावा करण्यात आला. साइडपट्ट्यांसह रुंदीकरणाचे काम त्वरित व्हावे.
द्वारकाप्रसाद दुबे, नगरसेवक, मूर्तिजापूर