सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करणार!

By admin | Published: March 13, 2017 02:36 AM2017-03-13T02:36:33+5:302017-03-13T02:36:33+5:30

कृषी विद्यापीठात ६0 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेला हा अभ्यासक्रम यावर्षी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

Organic Agriculture Degree course will be resumed! | सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करणार!

सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करणार!

Next

अकोला, दि. १२- यावर्षी सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी पुन्हा सुरू करण्यात आली आहे; पण अद्याप कोणत्याच हालचाली दिसत नसल्याने शेतकर्‍यांकडून याबाबत कृषी विद्यापीठाकडे विचारणा होत आहे. हा अभ्यासक्रम सुरू झाल्यास विदर्भातील विद्यार्थ्यांंना सेंद्रिय शेती व सेंद्रिय शेतमाल पदार्थाचे उद्योग उभे करता येतील.
सर्वच पिकांमध्ये कीटकनाशक रसायनांचा वाढलेला वापर मानवी आरोग्याला घातक ठरत आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पा तळीवरू न शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले, तरी रसायनांचा वापर कमी न होताच वाढला आहे. या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेती (पदविका) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे.
येथून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थी, शेतकर्‍यांनी सेंद्रिय पिके घेणे सुरू केले असून, यावर आधारित उद्योग सुरू केले आहे. हा पुन्हा सुरू करणार असल्याच्या हालचालींना यावर्षी वेग आला आहे.
या परिस्थितीत कृषी विद्यापीठाने कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांंना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणे सुरू ठेवले; परंतु शे तकर्‍यांना शिक्षण देणे हा या अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाने अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ६0 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेला हा अभ्यासक्रम यावर्षी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

सेंद्रिय शेतीचे शिक्षण देण्यासाठी सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम यावर्षी पुन्हा हा अभ्यासक्र म सुरू करण्यात येणार आहे.
- डॉ. व्ही.एम. भाले,
अधिष्ठाता (कृषी),
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Web Title: Organic Agriculture Degree course will be resumed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.