सेंद्रीय जैवतंत्रज्ञान पध्दतीने मिळविणार बोंडअळीवर नियंत्रण ! - आढावा सभेत डॉ.पंदेकृविचा अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:26 PM2018-05-08T15:26:26+5:302018-05-08T15:26:26+5:30
कापसावरील बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सेंद्रीय,जैवतंत्रज्ञान पध्दत वापरण्यात येईल असा अहवाल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या खरीप आढावा सभेत सादर केला.
- राजरत्न सिरसाट
अकोला : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, शासकीय पातळीवर कृषी विभाग,विद्यापीठांनी नियोजन केले आहे.पूर्व विदर्भात यावर्षी धानानंतर रब्बी ज्वारी तर मध्य व पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात सोयाबीन पिकानंतर मका, करडी व रब्बी ज्वारी पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. तर कापसावरील बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सेंद्रीय,जैवतंत्रज्ञान पध्दत वापरण्यात येईल असा अहवाल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या खरीप आढावा सभेत सादर केला.
पावसाच्या अनिश्चिततेचा प्रतिकुल परिणाम पिक उत्पादनावर होत असून, मागील वर्षी मोठी आर्थिक झळ शेतकºयांना बसली. उत्पादन तर घटलेच,विविध किड,रोगांनी पिकांचे नुकसान केले, विदर्भातीन कापूस पिकावर जहाल गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने सर्वात जास्त नुकसान झाले.यातून अद्याप शेतकरी सावरला नसल्याने यावर्षी खरीपाचे काटेकोर नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्र्यानी शनिवारी खरीप आढावा सभेत सुक्ष्म नियोजनावर भर दिला. त्यांनी राज्यातील वरिष्ठ कृषी अधिकारी,कृषी विद्यापीठांचे कुलगुरू ,वरिष्ठ शास्त्रज्ञ यांच्याकडून नियोजनाची माहिती जाणून घेतली. कृषी विभाग व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शास्त्रज्ञांनी यावर्षी वापरण्यात येणारे पीक तंत्रज्ञान,एकात्मिक किड व्यवस्थापनाचे नियोजन येथे सादर केले.विदर्भात सोयाबीनचा पेरा वाढला असला तरी कापूस नगदी पीक आजही शेतकरी घेतात,मान्सून पूर्व कापूस अलिकडे घेण्याकडे शेतकºयाचा कल वाढला आहे. पण मागील वर्षी मान्सूनपूर्व व खरीप हंगामातील बीटी कापसावर बोंडअळ््यांनी आक्रमण केले. विशेष म्हणजे या बीटी कापसात बोंडअळीला प्रतिबंधक जीन असताना हे घडले. यामुळे देशभर खळबळ उडाली. यावर्षी खरबरदारीचा उपाय म्हणून बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी खरीप आढावा बैठकीत नियोजन सादर केले. या कृषी विद्यापीठाने बोंडअळी व इतर किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जैवतंत्रज्ञान पध्दतीसोबत,पीक असलेल्या शेतात कामगंधसापळे लावण्यासाठीचे नियोजन केले .
पश्चिम विदर्भातील खारपाणपट्टयात खरीप हंगामातील सोयबीन पिकानंतर मका व ज्वारी पीक घेण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे उन्हाळ््यात भेडसावणाºया वैरणाचा प्रश्न काही अंशी कमी होईल,या संदर्भात शेतकºयांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. पूर्व विदर्भात पेरसावे तसेच रब्बीत ज्वारी पीक घेण्यात येईल.
- खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा सभेत सादर केले. बोंडअळीवर जैवपध्दतीने नियंत्रण मिळविण्यात येईल.तसेच मका,रब्बी ज्वारी पेरणी करण्याचा प्रयत्न राहील.
डॉ. व्ही.एम.भाले,कुलगुरू , डॉ.पंदेकृवि,अकोला.