अकोल्यात सेंद्रिय भाजीपाला उत्पादनावर भर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 03:10 PM2019-01-29T15:10:43+5:302019-01-29T15:10:59+5:30
अकोला : प्रत्येकाला पोषक अन्न मिळावे, ते अन्न विषमुक्त असावे, यासाठीचे प्रयत्न सर्वच स्तरावर केले जात असले तरी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशातील पहिला सेंद्रिय शेती अभ्यासक्रम सुरू करू न विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीची पदविका दिली आहे.
अकोला : प्रत्येकाला पोषक अन्न मिळावे, ते अन्न विषमुक्त असावे, यासाठीचे प्रयत्न सर्वच स्तरावर केले जात असले तरी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशातील पहिला सेंद्रिय शेती अभ्यासक्रम सुरू करू न विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीची पदविका दिली आहे. तद्वतच सेंद्रिय पिके, भाजीपाला उत्पादनावर भर दिला असून, येथे उत्पादित भाजीपाल्याची मागणी वाढली आहे.
सर्वच पिकांमध्ये वाढलेला कीटकनाशक रसायनाचा वारेमाप वापर मानवी आरोग्याला घातक ठरू लागला आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पातळीवरू न शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले तरी रसायनाचा हा वापर कमी न होता अधिकच वाढला आहे. या सर्व पृष्ठभूमीवर शेतकºयांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी कृषी विद्यापीठातील कृषी विद्या विभागाच्या प्रक्षेत्रावर सेंद्रिय पिके व भाजीपाला उत्पादन घेतले जात आहे. येथे तूर, कपाशी, मूग, उडीद आदी पिके तर सेंद्रिय पद्धतीने तयार केली जात असून, वांगे, टोमॅटो, मेथी, पालक, कोथिंबीर आदी भाजीपाला पिके घेण्यात येत अकोलेकरांना ही पर्वणी असल्याने भाजीपाल्याची मागणी प्रचंड वाढली असून, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या आठव्या सत्राचे विद्यार्थी येथे दररोज सकाळी ८ वाजता भाजीपाला पिकांची देखभाल, संगोपन करू न उत्पादन घेत आहेत. हाच भाजीपाला दररोज विकण्यात येतो. सध्या या प्रक्षेत्रावर वांगे, टोमॅटो, मेथी, पालक, कोथिंबीर आदी भाजीपाला पिके फुलली आहेत.
सेंद्रिय पिके उत्पादनासाठी येथे ‘मॉडेल’ तयार करण्यात आले असून, या उत्पादनासाठी गांडूळसह विविध जैविक खत निर्मिती करण्यात येत आहे. सेंद्रिय शेती विकासावर राष्टÑीय पातळीवरील कार्यशाळाही घेण्यात येत असून, या विषयावरील तज्ज्ञांना बोलाविण्यात येते. शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत असून, शिवारफेरीत सेंद्रिय शेती मॉडेलला हजारो शेतकºयांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.
- सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन येथे घेतले जात असून, विद्यार्थीच हे उत्पादन घेत आहेत. त्यासाठी त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे.
डॉ. व्ही. एम. भाले,कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.