विद्यापीठातर्फे जिल्हास्तरीय अविष्कार महोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:53 PM2018-12-11T13:53:01+5:302018-12-11T13:53:21+5:30
अकोला: संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती अंतर्गत जिल्हास्तरीय अविष्कार २0१८ महोत्सवाचे महाविद्यालयीन स्नातक, स्नातकोत्तर व संशोधक विद्यार्थ्यांसाठी २0१८ चे आयोजन १७ डिसेंबर रोजी शिवाजी महाविद्यालयामध्ये करण्यात येणार आहे.
अकोला: संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती अंतर्गत जिल्हास्तरीय अविष्कार २0१८ महोत्सवाचे महाविद्यालयीन स्नातक, स्नातकोत्तर व संशोधक विद्यार्थ्यांसाठी २0१८ चे आयोजन १७ डिसेंबर रोजी शिवाजी महाविद्यालयामध्ये करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एकनाथ उपाध्ये राहतील, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे राहतील. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अविष्कार महोत्सवामध्ये सर्व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विद्यापीठाचे राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करावे आणि समाजपयोगी संशोधन प्रकल्प सादर करण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र. कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देषमुख, संचालक डॉ.डी.टी. इंगोले, नवोपक्रम नवसंशोधन व सहचर्य, समन्वयक डॉ. आनंद अस्वार यांनी केले आहे. या महोत्सवासाठी समन्वयक म्हणून डॉ.जी.व्ही. कोरपे, सहसमन्वयक डॉ.ए.बी. पांडे आहेत. विद्यार्थ्यांनी महोत्सवासाठी १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी. युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासोबत त्यांच्यातील चिकित्सक वृत्तीला चालना देणे या भूमिकेतून अविष्काराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये जिल्हास्तरावर उत्कृष्ट ठरलेले संशोधन प्रकल्प राज्य व राष्ट्रीय स्तरासाठी निवडले जातात. अविष्कारमध्ये मानव्य शाखा, भाषा व कला शाखा, वाणिज्य व्यवस्थापन व विधी, विज्ञान, कृषी व वैद्यकीय शास्त्र, आरोग्य व औषधी निर्माण शास्त्र या पाच शाखांमधील स्नातक, स्नातकोत्तर एम. फिल, पीएच.डी.चे विद्यार्थी व आचार्य पदवीसाठी संशोधन करणारे शिक्षक संशोधन प्रकल्प सादर करू शकतात. प्रत्येक जिल्ह्यातून जास्तीत जास्त ४0 संशोधन प्रकल्प विद्यापीठ स्तरावर पाठविले जातात. अविष्कार महोत्सवाच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. आशिष राऊत, प्रा. डॉ. संजय खडक्कार, डॉ. अंजली कावरे, डॉ. अनिल राऊत, डॉ. अर्चना पेठे, डॉ. संजय शेंडे, डॉ. संजय पल्हाडे, डॉ. जीवन पवार, डॉ. दीपक कोचे, डॉ. श्रद्धा थोरात, डॉ.एस.ई. निश्चि, डॉ. राहुल मोहोड, डॉ. उमेश घोडेस्वार आदी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)