‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराच्या वतीने अकोल्यात रविवारी ‘सुमेरु संध्ये’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 02:55 PM2018-01-04T14:55:54+5:302018-01-04T15:08:21+5:30

अकोला: श्री श्री रविशंकरजी प्रणित ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराच्या वतीने नववर्ष पर्वावर अकोलकर नागरिकांना सत्संगाची संगत मिळावी या हेतूने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक शालिनी व श्रीनिवास यांची भव्य संगीत संध्या अर्थात ‘सुमेरू संध्ये’चे आयोजन.

Organized by 'Art of Living' on Sunday in Akola. | ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराच्या वतीने अकोल्यात रविवारी ‘सुमेरु संध्ये’चे आयोजन

‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराच्या वतीने अकोल्यात रविवारी ‘सुमेरु संध्ये’चे आयोजन

googlenewsNext
ठळक मुद्देहरीश लाखानी यांनी स्थानीय रघुवंशी मंगल कार्यालय सभागृहात बुधवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.प्रस्तुत संगीत संध्या ही अकोलकर नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आली असून, नागरिकांनी या संगीतमय संध्येचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


अकोला: श्री श्री रविशंकरजी प्रणित ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराच्या वतीने नववर्ष पर्वावर अकोलकर नागरिकांना सत्संगाची संगत मिळावी या हेतूने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक शालिनी व श्रीनिवास यांची भव्य संगीत संध्या अर्थात ‘सुमेरू संध्ये’चे आयोजन रविवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६-३० वा. डॉ .आंबेडकर खुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराचे हरीश लाखानी यांनी स्थानीय रघुवंशी मंगल कार्यालय सभागृहात बुधवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी परिवाराचे वरिष्ठ शिक्षक कैलाश अग्रवाल,जिल्हा विकास समिती सदस्य सुहासिनी धोत्रे,जगन्नाथ कराळे,महेंद्र खेतान, पुरुषोत्तम पसारी,श्रीकांत पडगिलवार,जसवंत कावणा,आशिष झुनझुनवाला, डॉ.अरुण देशमुख आदी पदाधीकारी उपस्थित होते.
‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराच्या वतीने जगभरात माणुसकी व सदाचार जिवंत ठेवणारे अनेक कल्याणकारी व मानवोपयोगी उपक्रम सुरु आहेत.या सेवाभावी कार्यात गुरुदेवांचे कोट्यवधी शिष्य जगभरात जुळलेले असून रचनात्मक कार्ये होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ म्हणजे जीवन जगण्याची कला असून, या माध्यमातून परिवाराच्याअनेक शाखांत योग्य व एकाग्रतेचे लहान मुलांपासून तो प्रौढ व्यक्तीपर्यंतचे कोर्सेस सुरु आहेत. प्रस्तुत संगीत संध्या ही अकोलकर नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आली असून, नागरिकांनी या संगीतमय संध्येचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिवाराचे सदस्य प्रशिक्षक संतोष मारशेट्टीवार, ज्ञानेश्वर कपले, रामकृष्ण दालमिया, प्रशांत साबळे, सुधीर इंगळे,अर्चना मारशेट्टीवार,आरती देशपांडे, अ‍ॅड. मनीषा कुलकर्णी, दीपक वोरा, शाम विसपुते, दिनेश मुरजानी, संजय शेळके, अंबादास सिंघानिया, राम घायाळ, प्रवीण शिंदे ,कांचन शिंदे, नयना शेगोकार, सुनीता शर्मा आदी प्रयत्न करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

Web Title: Organized by 'Art of Living' on Sunday in Akola.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.