अकोल्यात २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान 'भूगोल प्रदर्शन-२0१८'चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 02:27 AM2018-02-18T02:27:06+5:302018-02-18T02:27:24+5:30

अकोला: निसर्ग शिक्षण कार्यसंस्था व बाल शिवाजी शाळा  यांच्या संयुक्त विद्यमाने जठारपेठ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत भूगोल प्रदर्शन-२0१८ चे आयोजन केले आहे. 

Organizing 'Geography Performance-2018' in Akola from February 21 to 23 | अकोल्यात २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान 'भूगोल प्रदर्शन-२0१८'चे आयोजन

अकोल्यात २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान 'भूगोल प्रदर्शन-२0१८'चे आयोजन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: निसर्ग शिक्षण कार्यसंस्था व बाल शिवाजी शाळा  यांच्या संयुक्त विद्यमाने जठारपेठ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत भूगोल प्रदर्शन-२0१८ चे आयोजन केले आहे.  २१ फेब्रुवारीला अण्णासाहेब देव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा आरंभ होईल. प्रत्येक दिवशी सकाळी ९, ११ व दुपारी १ व ३ वाजता असे चार शो घेण्यात येतील. प्रत्येक कार्यक्रम हा दीड तासाचा राहील. गोल-गोल वाटणारा भूगोल अधिक गोड वाटावा, अनेक साध्या परंतु दुर्मीळ बाबी जनसामान्यांपर्यंत सहजरीत्या पोहचाव्यात, यासाठीच प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती निसर्ग अभ्यास केंद्र संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.

Web Title: Organizing 'Geography Performance-2018' in Akola from February 21 to 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.