आंतरशालेय गीतगायन स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:23 AM2021-09-14T04:23:51+5:302021-09-14T04:23:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : सर्वांच्या घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन नुकतेच झाले आहे. या वर्षीही कोरोनाच्या सावटामुळे बाप्पा भक्तांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सर्वांच्या घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन नुकतेच झाले आहे. या वर्षीही कोरोनाच्या सावटामुळे बाप्पा भक्तांची गणेशोत्सवाचा जल्लोष करण्याची इच्छा अपूर्णच राहील. परंतु, घरोघरी बाप्पाची थाटात स्थापना करून सर्वांनी आपापल्या परीने गणरायाच्या या उत्सवाचा अनंद साजरा केला. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी लोकमत बाल विकास मंचतर्फे श्री समर्थ पब्लिक स्कूल, अकोलाच्या सहकार्याने गणपती बाप्पाच्या गीतांच्या आंतरशालेय गीतगायन स्पर्धेचे आयोजन येत्या गुरुवार, १६ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता, श्री समर्थ पब्लिक स्कूल, रणपिसे नगर, अकोला येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता इयत्ता ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी अशा दोन गटांमधून प्रत्येकी एक अशाप्रकारे शाळांमधून प्रवेश मागविण्यात येणार आहेत. या स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांना श्रीगणेशाचे गाणे गायचे आहे.
यामध्ये प्रत्येक सहभागीला सहभाग प्रमाणपत्र व विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेकरिता स्पर्धकांना आपल्या शाळेमार्फतच प्रवेश घेता येईल. स्पर्धेकरिता प्रवेश स्वीकारण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर असून, ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आपल्या शाळेमार्फत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संपर्क ८४८२९६३६०८, ९९७०४५७७६०
फेसबुक पेजवर लाइव्ह बघता येईल
सध्या कोरोना प्रतिबंधात्मक नियम लक्षात घेता या कार्यक्रमाकरिता फक्त स्पर्धक व त्यांच्यासोबत शिक्षकांनाच कार्यक्रमस्थळी उपस्थित राहता येईल व इतरांना हा कार्यक्रम आपल्या घरूनच https://www.facebook.com/lokmatpathshala/ या फेसबुक पेजवर लाइव्ह बघता येईल.