आरक्षण बचाव परिषदेचे परिसंवाद आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:26 PM2017-10-12T13:26:11+5:302017-10-12T13:26:22+5:30
अकोला. देशातील बहुसंख्य असणा-या मागासवर्गीयांना संविधानाच्या माध्यमातून देण्यात आलेले हक्क प्रतिगामी व्यवस्था न्यायालयाच्या माध्यमातून संपूष्टात आणीत आहेत. याबाबतची जनजागृति करण्याच्या दृष्टिने स्वतंत्र मजदूर यूनियन व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संगठन व महाराष्ट्र राज्य आरक्षण बचाव मध्यवर्ती कृति समिति अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आरक्षण बचाव परिषदेचे परिसंवाद 14 आक्टोबर 2017 ला स्थानीय प्रमिलाताई ओक हॉल सकळी 10 वा. आयोजित केले आहे. या परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटक पारस महानिर्मिती चे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे, प्रमुख मार्गदर्शक स्वतंत्र मजदूर यूनियन तथा मुख्य सल्लागार मागासवर्गीय संगठन चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संगठनचे केंद्रीय मुख्य संगठक एस.के. हनवते लाभनार आहेत. कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, महावितरण चे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, मुर्तिजापुरचे तहसीलदार राहुल तायडे, सेवा निवृत्त उपशिक्षणाधिकारी पी.जे. वानखडे, स्वतंत्र मजदूर यूनियर महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डी.एम. खैरे यांची प्रमुख उपस्थिति राहणार आहे. कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन स्वतंत्र मजदूर यूनियन, म. रा. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संगठन, वितरण, पारेषन, निर्मिति म.रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, कास्ट्राइब राज्य परिवहन कर्मचारी संगठन, म.रा. बहुजन कर्मचारी कल्याण संगठन, विदर्भ कोकण ग्रामीण बैंक कर्मचारी वेल्फेअर एसो., कास्ट्राईब शिक्षक संगठन, अ.भा. एस.सी.एसटी असो., पोस्टल एम्प्लाइज ने केले आहे. ही माहिती पत्रका द्वारे अभियंता सुनील कांबळे ने दिली आहे.