राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:53 AM2020-12-04T04:53:56+5:302020-12-04T04:53:56+5:30
सदर मेळाव्यामध्ये नामांकित खासगी उद्योजक, कंपनी व त्यांचे प्रतिनिधी विविध पदांसाठी ऑनलाइन भरती प्रक्रिया राबवतील. दहावी, बारावी, आयटीआय, ...
सदर मेळाव्यामध्ये नामांकित खासगी उद्योजक, कंपनी व त्यांचे प्रतिनिधी विविध पदांसाठी ऑनलाइन भरती प्रक्रिया राबवतील. दहावी, बारावी, आयटीआय, पदविका व पदवीधारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना ऑनलाइन अप्लॉय करून या ऑनलाइन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रा. यो. बारस्कर यांनी केले आहे.
घरोघरी सर्वेक्षण करा- पालकमंत्री
अकोला: जिल्ह्यात संयुक्त कुष्ठ व क्षयरुग्ण शोध मोहीम १ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधीनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.
नवोदय विद्यालयात प्रवेश प्रक्रिया
अकोला: जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावीसाठीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, प्रवेश परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरावयाचे आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या पालकांनी जास्तीत जास्त संख्येने पाल्यांना परीक्षेत बसविण्यासाठी प्रवेश अर्ज भरावे, असे आवाहन पालकमंत्री ना. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.