याेग शिबिराचे आयाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:13 AM2021-06-18T04:13:59+5:302021-06-18T04:13:59+5:30

आयएमएच्या वतीने निषेध दिन अकोला - काेराेना संकटातही डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा,आरोग्य कर्मचारी व रुग्णालयातील वैद्यकीय वर्गावर जोमाने ...

Organizing yoga camps | याेग शिबिराचे आयाेजन

याेग शिबिराचे आयाेजन

Next

आयएमएच्या वतीने निषेध दिन

अकोला - काेराेना संकटातही डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा,आरोग्य कर्मचारी व रुग्णालयातील वैद्यकीय वर्गावर जोमाने हल्ले होत आहेत. ही निंदनीय बाब असून हे हल्ले रोखण्यासाठी शासनाने त्वरित कायदे करून हे हल्ले थांबविण्याची मागणी आयएमएने केली आहे. या संदर्भात शुक्रवार दिनांक १८ जून रोजी निषेध दिन आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी सर्व डॉक्टर आपले दवाखाने, इस्पितळ बंद न ठेवता,रुग्णांची गैरसोय टाळून निषेधात्मक काळ्या फिती व काळा मास्क घालून हे आंदोलन राबविणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन ही देण्यात येणार आहे अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र काळे,सचिव डॉ. तेजस वाघेला, डॉ. अमोल केळकर,कोषाध्यक्ष डॉ. रणजित देशमुख यांनी दिली आहे

..................

साध्या पद्धतीने होणार महानगरात महेश नवमी सोहळा

अकोला- काेरोना संकट बघता यंदा भगवान महेश नवमी उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व ऑनलाईन माध्यमातून संपन्न होणार आहे,माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने स्थानिक माहेश्वरी भवन येथे शनिवार १९ जून रोजी पावन महेश नवमी ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे, समाज ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्र चांडक यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अनुप कोठारी व डॉ. ज्योती कोठारी हे उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते भगवान महेश यांचे पूजन होऊन सकाळी १० -१५ वाजता डॉ. अनुप कोठारी यांचे आरोग्य विषयावर व्याख्यान होणार आहे. या पावन पर्वावर स. ११ -३० वाजता जुना

आरटीओ परिसरातील स्थानिक महेश भवन येथे मान्यवरांच्या हस्ते चाळीस नारळ वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे,नवमी पर्वात माहेश्वरी भवन येथे योग प्रशिक्षिका श्रद्धा मोकाशी यांचे दि. २० जून पर्यंत सर्व समाजातील महिला व पुरुषांसाठी योग प्राणायाम व ध्यान शिबिर सुरू आहे. काेरोना संकट बघता यावर्षीचा पारंपरिक उत्सव सोहळा व शोभायात्रा रद्द करण्यात आली असून समाजातील प्रत्येक महिला पुरुषाने नवमीच्या सोहळा आपल्या घरीच भगवान महेश यांची पूजा अर्चना करून साध्या स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्र चांडक,उपाध्यक्ष शांतीलाल भाला,जयप्रकाश चांडक,प्रधानमंत्री डॉ संदीप चांडक, सहाय्यक मंत्री सुरेश मुंदडा,कोषाध्यक्ष विजयकुमार राठी,अंकेक्षक कुंजबिहारी जाजु,तथा सदस्य विजयकुमार तोषनीवाल,विनोद लोहिया,रमेश राठी,नरेश बियाणी,द्वारकादास चांडक,केशव खटोड,अरुण कोठारी,नंदकिशोर बाहेती,इंदुमती मोहता,नरेंद्रकुमार भाला, विनीत बियाणी,संतोष हेडा,गोपाल केला, राजेंद्र चितलांगे,संदेश रांदड, दीपक सारडा,अजय बियाणी,राजेंद्र करवा,संजय सारडा आदींनी केले आहे.

......................

मनपा क्षेत्रातील पूर्व झोनमध्‍ये वृक्षारोपण.

अकोला – अकोला महानगरपालिका प्रशासनाद्वारे तसेच निसर्ग वैभव, कम्‍पेशन फॉर ॲनिमल्‍स ॲण्‍ड प्रोटेक्‍शन सोसायटी (कॅप्‍स) अकोला आणि रॉबिन हूड आर्मी यांच्‍या सहकार्याने बुधवारी पूर्व क्षेत्रातील शासकीय दूध डेअरीच्‍या मागील जलकुंभ परिसर आणि प्रभागातील गार्डन येथे वृक्षारोपण संपन्‍न झाला आहे. यावेळी आयुक्‍त नीमा अरोरा, नगरसेवक आशिष पवित्रकार, नगरसेविका .सुजाता अहीर, कम्‍पेशन फॉर ॲनिमल्‍स ॲण्‍ड प्रोटेक्‍शन सोसायटी (कॅप्‍स) अकोलाचे पदाधिकारी, निसर्ग वैभवच्‍या पदाधिकारी आणि रॉबिन हूड आर्मीचे पदाधिकारी क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, कनिष्‍ठ अभियंता चिमनकर, आराेग्य निरीक्षक सुरेश पुंड, सामाजिक कार्यकर्ता निशिकांत बडगे उपस्थित हाेते.

.................

शाळेच्या फी साठी अडवणूक नकाे

अकोला : फी वसुलीसाठी सुरू असलेली दादागिरी शाळा व्यवस्थापनाने थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे थकीत फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन व्हाॅट्सअ‍ॅप ॲप ग्रुपमध्ये समावेश करून शिक्षण दिल्या जाईल इतरांना नाही अशा नोटीस शाळा व्यवस्थापन पालकांना पाठवत आहेत ही मनमानी थांबविण्याची मागणी इंगळे यांनी केली आहे.

.......................

Web Title: Organizing yoga camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.