जिल्ह्यात ‘अनाथां’चे काढले ‘आधार’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:58 AM2021-01-08T04:58:44+5:302021-01-08T04:58:44+5:30
अकोला : आई, वडील नसलेल्या जिल्ह्यातील चार बालगृहांतील ५६ अनाथ बालकांचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत आधार कार्ड ...
अकोला : आई, वडील नसलेल्या जिल्ह्यातील चार बालगृहांतील ५६ अनाथ बालकांचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत आधार कार्ड काढण्यात आले.
आई-वडिलांचे छत्र नसलेल्या ५६ बालकांची जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील चार बालगृहांत व्यवस्था करण्यात आली आहे. बालगृहात आश्रय देण्यात आलेल्या ६ ते १८ वर्षे वयोगटातील या बालकांना विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत ‘अनाथ’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत गत १४ ऑगस्टपर्यंत ५६ अनाथ बालकांचे आधार कार्ड काढण्यात आले असून, त्यांचे बँक खातेही उघडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
निराधार योजनेचाही लाभ मंजूर!
जिल्ह्यातील चार बालगृहांमधील अनाथ ५६ बालकांना गत ऑक्टोबरमध्ये संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. योजनेंतर्गत दरमहा अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या जिल्हा संरक्षण कक्षाच्या सूत्रांनी सांगितले.