अन्यथा दर दहा दिवसाला कोरोना चाचणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:16 AM2021-06-04T04:16:00+5:302021-06-04T04:16:00+5:30
पातूर तहसील कार्यालयात बुधवारी दुपारी ३ वाजता झालेल्या तालुका प्रशासन आरोग्य यंत्रणा आणि नगर प्रशासनाच्या बैठकीत त्यांनी हा इशारा ...
पातूर तहसील कार्यालयात बुधवारी दुपारी ३ वाजता झालेल्या तालुका प्रशासन आरोग्य यंत्रणा आणि नगर प्रशासनाच्या बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार येऊ घातलेली कोरोनाची तिसरी लाट निष्प्रभ ठरावी आणि नागरिकांना बाधा होऊ नये. या दृष्टिकोनातून सुपर स्प्रेडर म्हणजेच भाजी विक्रेते, फळ विक्रेते, किराणा दुकानदार, इतर व्यावसायिक दुकानदार, दवाखाने, मेडिकल, दूध डेअरी, शासकीय कार्यालये, आरोग्य यंत्रणा आदी क्षेत्रातील नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. अन्यथा ज्यांनी लसीकरण करून घेतले नाही. त्या सर्वांची दर दहा दिवसांनी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात येईल. ज्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले नसल्याचे आढळून आल्यास व्यावसायिक केंद्र सील करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. बैठकीला तहसीलदार दीपक बाजड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, नगर परिषदेच्या शिप्रा लोणारे आदींची हजेरी होती.
तालुक्यात कोरोनाचे १२५ रूग्ण
पातूर तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात २ हजार ४१६ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. सध्या ग्रामीण भागात १०२, शहरी भागात २३ असे एकूण १२५ कोरोना रूग्ण सक्रिय आहेत.