‘त्या’ २४ अतिरिक्त शिक्षकांपैकी नऊ जणांचे जिल्हय़ाबाहेर समायोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:30 PM2017-12-19T23:30:23+5:302017-12-19T23:31:27+5:30

अकोला : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी जिल्हय़ातील विविध शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ६६ शिक्षकांपैकी ४२ शिक्षकांचे ऑनलाइन पद्धतीने समायोजन केले. उर्वरित २४ शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविले.

Out of the 24 additional teachers, nine out of the district's Adjustment! | ‘त्या’ २४ अतिरिक्त शिक्षकांपैकी नऊ जणांचे जिल्हय़ाबाहेर समायोजन!

‘त्या’ २४ अतिरिक्त शिक्षकांपैकी नऊ जणांचे जिल्हय़ाबाहेर समायोजन!

Next
ठळक मुद्देशिक्षकांना न्यायाची प्रतीक्षाशिक्षण संस्थांचा रुजू करून घेण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी जिल्हय़ातील विविध शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ६६ शिक्षकांपैकी ४२ शिक्षकांचे ऑनलाइन पद्धतीने समायोजन केले. उर्वरित २४ शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविले. शिक्षण उपसंचालकांनी जिल्हय़ातील २४ पैकी नऊ अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हय़ाबाहेरील शिक्षण संस्थांमध्ये समायोजन केले खरे; परंतु या शिक्षण संस्थांनी या शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिल्यामुळे आता कुठे जावे, असा प्रश्न अतिरिक्त शिक्षकांना पडला आहे. 
शिक्षणाधिकारी कार्यालयाने चार महिन्यांपूर्वी जिल्हय़ातील शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची आरक्षण व विषयनिहाय माहिती मागविली होती. त्यानुसार जिल्हय़ात ६६ अतिरिक्त शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली. या ६६ अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा स्तरावर ऑनलाइन पद्धतीने समायोजन करण्याचा कार्यक्रम आखला. प्रारंभी शिक्षणाधिकार्‍यांनी ६६ पैकी ४२ शिक्षकांचे जिल्हय़ातील विविध शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन केले आणि २४ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा विषय अमरावती विभाग स्तरावर शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्यात आला. जिल्हय़ातील अनेक शाळांमध्ये या शिक्षकांच्या आरक्षण व विषयानुसार रिक्त पदे असल्यामुळे त्यांनी जिल्हय़ातील शाळांमध्ये समायोजन करण्याची विनंती केली होती; परंतु त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून आणि नियमांना डावलून, शिक्षण उपसंचालकांनी २४ पैकी नऊ अतिरिक्त शिक्षकांचे बुलडाणा जिल्हय़ातील विविध शिक्षण संस्थांमध्ये समायोजन केले; परंतु या शिक्षण संस्थांनी अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिल्यामुळे शिक्षकांची गोची झाली आहे. आता कुठे जावे, असा प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहेत. जिल्हय़ातील अनेक शाळांमध्ये आरक्षण व विषयानुसार शिक्षकांची पदे रिक्त असताना, या शिक्षकांना जिल्हय़ाबाहेर पाठविण्याचे प्रयोजनच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हय़ातील शाळांमध्येच या शिक्षकांचे समायोजन व्हायला हवे, असा शिक्षकांचा आग्रह आहे. अतिरिक्त शिक्षकांवर अन्याय होत असताना शिक्षक संघटना त्याविषयी बोलायला तयार होत नाहीत. त्यामुळे दाद मागावी कुणाकडे, अशा विवंचनेत अतिरिक्त शिक्षक सापडले आहेत. 

Web Title: Out of the 24 additional teachers, nine out of the district's Adjustment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.