५३५ पैकी केवळ २८७ ग्रामपंचायतींमध्ये हाताला काम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:21 AM2021-03-09T04:21:46+5:302021-03-09T04:21:46+5:30

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींपैकी केवळ २८७ ग्रामपंचायतींच्या स्तरावर सद्य:स्थितीत एक हजार ...

Out of 535, only 287 gram panchayats have manual work! | ५३५ पैकी केवळ २८७ ग्रामपंचायतींमध्ये हाताला काम !

५३५ पैकी केवळ २८७ ग्रामपंचायतींमध्ये हाताला काम !

Next

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींपैकी केवळ २८७ ग्रामपंचायतींच्या स्तरावर सद्य:स्थितीत एक हजार ३२४ कामे सुरू असून, त्यावर काम करीत असलेल्या पाच हजार १२७ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत विविध कामे करण्यात येतात. त्यामध्ये फळबाग लागवड, वृक्षलागवड, रोपवाटिका, वृक्ष संगोपन, घरकूल, गुरांचे गोठे, शाैचखड्डे, सिंचन विहिरी, तुती लागवड आदी प्रकारची कामे करण्यात येतात. रोहयो अंतर्गत जाॅबकार्डधारक मजुरांना मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्यात येतात. जिल्ह्यात एकूण ५३५ ग्रामपंचायती असून, त्यापैकी केवळ २८७ ग्रामपंचायतींतर्गत सद्य:स्थितीत रोजगार हमी योजनेची एक हजार ३२४ कामे सुरू आहेत. सुरू असलेल्या कामांवर पाच हजार १२७ मजुरांची उपस्थिती आहे. संबंधित ग्रामपंचायतींतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू असल्याने मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींमध्ये सुरू

असलेली कामे व मजूर उपस्थितीची स्थिती!

तालुका ग्रामपंचायत कामे मजूर

अकोला ५७ २६० १०३३

अकोट ५३ ३२३ ११०२

बाळापूर ३५ १८६ ७३७

बार्शिटाकळी ४० १४५ ६०२

मूर्तिजापूर ४० १७३ ७२८

पातूर ३९ १६९ ६६४

तेल्हारा २३ ६८ २६१

...................................................................................................

एकूण २८७ १३२४ ५१२७

सर्वात कमी रोजगार तेल्हारा तालुक्यात!

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतींतर्गत कामे सुरू असून, या कामांवर पाच हजार १२७ मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सर्वाधिक ३२३ कामे सुरू असून, या कामांवर एक हजार १०२ मजुरांना रोजगार मिळाला आहे. तेल्हारा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ६८ कामे सुरू असून, त्यावर केवळ २६१ मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे रोहयोंतर्गत जिल्ह्यात सर्वात कमी तेल्हारा तालुक्यात मजुरांना रोजगार मिळाल्याचे चित्र आहे.

Web Title: Out of 535, only 287 gram panchayats have manual work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.