पातूर तालुक्यात शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:19 AM2021-03-05T04:19:37+5:302021-03-05T04:19:37+5:30
दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहिम राबवली जाते. यावर्षी १ ते १० मार्चदरम्यान मोहीम राबविली जात आहे. ...
दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहिम राबवली जाते. यावर्षी १ ते १० मार्चदरम्यान मोहीम राबविली जात आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या दीडशेच्या वर गेल्यामुळे घरोघरी जाऊन प्रगणना करणाऱ्या शिक्षकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सदर मोहीम ३ ते १८ वयोगटांमध्ये विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर असतील तर त्यांना या सर्वेक्षणात मार्फत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. ३ ते ६ या वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहिम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मदतीने पार पाडण्यात येते आहे. ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहिम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यामधील शिक्षकांच्या माध्यमातून सदर सर्वेक्षण पार पाडले जाते.
शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहिम एकाच वेळी पार पाडली जात असल्यामुळे विज्युक्टा, विदर्भ माध्यमिक डीएड संघटना, शारिरीक शिक्षक संघटना, राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे बी. आर. राजगुडे, एस. आर. खाडे, आर. टी. सोळंके, सी. आर. साळुंके, पि. एस. उंबरकर, जी. एम. निमकंडे, एस. एस. डोंगरे, एस. टी. ठाकूर, एस. बी. चव्हाण, एसटी अंधारे, एस. एस. जाधव, पी. डी. वाघमारे, एस. ए. हिवराळे, एन. व्ही. पाकदूणे, पी. पी. वाकोडे, व्ही. ए. गहलोत आदींनी शोधमोहिमेला विरोध केला आहे.