काेराेनाचा प्रादुर्भाव; शहरात २१० जण पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:18 AM2021-04-16T04:18:17+5:302021-04-16T04:18:17+5:30
१११३ जणांनी केली चाचणी गुरुवारी १११३ जणांनी शहराच्या विविध चाचणी केंद्रांत जाऊन नमुने दिले. यामध्ये २८८ जणांनी आरटीपीसीआर चाचणी ...
१११३ जणांनी केली चाचणी
गुरुवारी १११३ जणांनी शहराच्या विविध चाचणी केंद्रांत जाऊन नमुने दिले. यामध्ये २८८ जणांनी आरटीपीसीआर चाचणी केली असून, ८२५ जणांनी रॅपिड ॲन्टिजेन चाचणी केली आहे. यासर्व संशयितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
मनपाची यंत्रणा सैरभैर
शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. काेराेनाचा संसर्ग पसरल्यामुळे मनपाने झाेननिहाय चाचणी केंद्रांसह फिरत्या वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काेराेनामुळे दरराेज नागरिकांचे मृत्यू हाेत असताना नागरिकांना कोविचेही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. यामुळे काेराेनाबाधितांचा आकडा वाढला असून, मनपाची वैद्यकीय आराेग्य यंत्रणा सैरभैर झाल्याचे चित्र आहे.
नियम पायदळी
बाजारपेठेत भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना अकाेलेकर कमालीचे बेफिकीर आढळून येत आहेत. परिणामी रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी शहरात २१० जणांना काेराेनाची लागण झाली आहे. यामध्ये पूर्व झाेन अंतर्गत ९३, पश्चिम झोन २८, उत्तर झोन ३५ आणि दक्षिण झोन अंतर्गत ५४ जणांचा समावेश आहे.