काेराेनाचा उद्रेक; फिरत्या व्हॅनद्वारे संशयितांचे स्वॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 10:24 AM2021-02-23T10:24:34+5:302021-02-23T10:24:40+5:30

Swab of suspects by mobile van शहरात काेराेनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या विविध भागांत संशयितांचे नमुने घेण्याला साेमवारी प्रारंभ केला.

Outbreak of corona; Swab of suspects by mobile van | काेराेनाचा उद्रेक; फिरत्या व्हॅनद्वारे संशयितांचे स्वॅब

काेराेनाचा उद्रेक; फिरत्या व्हॅनद्वारे संशयितांचे स्वॅब

Next

- आशीष गावंडे

अकाेला:  जिल्ह्यासह शहरात पुन्हा एकदा काेराेनाचा उद्रेक झाल्याचे समाेर आले असून काेराेनाची लागण झालेल्या भागात फिरत्या व्हॅनद्वारे हायरिस्कमधील संशयितांचे स्वॅब नमुने घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी महापालिकेला दिले आहेत. त्या अनुषंगाने मनपाच्या वैद्यकीय आराेग्य पथकाने शहरात काेराेनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या विविध भागांत संशयितांचे नमुने घेण्याला साेमवारी प्रारंभ केला. पश्चिम विदर्भातील अकाेला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत संसर्गजन्य काेराेना विषाणूची अचानक लाट आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांची झाेप उडाली आहे. अमरावतीमध्ये एकाच दिवशी ५०० ते ७०० काेराेनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आराेग्य यंत्रणेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हीच परिस्थिती अकाेला जिल्ह्यासह शहरात असून दरराेज किमान २०० ते २५० जण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त हाेत आहेत. धाेक्याची घंटा ओळखून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी नियमांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. काेराेना पाॅझिटिव्ह असल्यावरही रुग्ण घराबाहेर व बाजारपेठेत खुलेआम फिरत असल्याने काेराेनाचा माेठ्या झपाट्याने प्रसार हाेत आहे. शहरातील पूर्व व दक्षिण झाेन काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्कमधील व्यक्ती काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेत नसल्याची बाब समाेर आली आहे. त्यामुळे हायरिस्कमधील व्यक्तींच्या परिसरात किंवा घरी जाऊन स्वॅब घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मनपाच्या वैद्यकीय आराेग्य विभागाने दाेन फिरत्या व्हॅनद्वारे स्वॅब जमा करण्याला सुरुवात केली आहे.

 

शहरातील काही भाग काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरू लागले आहेत. याला वेळीच आवर घालण्यासाठी संबंधित परिसरात तसेच थेट रुग्णाच्या संपर्कातील हायरिस्क व्यक्तींपर्यंत पाेहाेचून त्यांचे स्वॅब नमुने जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास कडक निर्बंध लागू करावे लागतील.

-जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी अकाेला

Web Title: Outbreak of corona; Swab of suspects by mobile van

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.