मूर्तिजापुरात डेंग्यूचा प्रकोप; उपाययोजना करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:23 AM2021-08-14T04:23:36+5:302021-08-14T04:23:36+5:30
मूर्तिजापूर : शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला असून, नागरिकांध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील डेंग्यूचा प्रकोप थांबविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा, ...
मूर्तिजापूर : शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला असून, नागरिकांध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील डेंग्यूचा प्रकोप थांबविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप जळमकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरोनाचे संकट कायम असतानाही मूर्तिजापूर शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असताना दिसत आहे. डेंग्यूचा प्रकोप वाढू नये, यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शहरात जागोजागी साचलेली पाण्याची डबकी तसेच वाढलेल्या गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे फॉगिंग फवारणी करण्यात यावी, तसेच साचलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये गप्पी मासे सोडून मच्छरांची पैदास नष्ट करण्यासाठी उपाय करण्यात यावे, पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी पाण्याची डबकी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहेत. नगर परिषद प्रशासनाने शहरातील विविध ठिकाणी गवताचे निर्मूलन करून फाॅगिंग फवारणी करावी, अशी मागणी या निवेदनातून संदीप जळमकर यांनी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी नगरसेवक सचिन देशमुख, राहुल गुल्हाने उपस्थित होते.