मूग पिकावर लीफ क्रिनकल रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:32+5:302021-07-22T04:13:32+5:30
अशी आहेत रोगाची लक्षणे या रोगामुळे रोगग्रस्त झाडाच्या पानावर खोलगट व उभरलेल्या भेगा दिसतात. तसेच पानाची टोकेही वाकतात व ...
अशी आहेत रोगाची लक्षणे
या रोगामुळे रोगग्रस्त झाडाच्या पानावर खोलगट व उभरलेल्या भेगा दिसतात. तसेच पानाची टोकेही वाकतात व झाडे खुरटी, खुजी राहतात. झाडे शेंड्याकडून खाली वाळत येतात. पानाच्या शिरा काहीवेळा पिवळ्या पडतात. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो. या फुलोऱ्यास शेंगा लागत नाहीत.
रोगग्रस्त बियाण्यांव्दारे प्रसार
या विषाणू रोगाचा प्रसार मुख्यत: रोगग्रस्त बियाण्यांव्दारे होतो. एखाद्या भागात बियाण्यांव्दारे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास त्या भागात रस शोषण करणाऱ्या किडींमुळे या रोगाचा दुय्यम प्रसार होतो; परंतु या भागात प्रत्यक्ष पाहणीदरम्यान मुगावर रस शोषण करणाऱ्या किडी आढळून आल्या नाहीत.
शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या उपाययोजना
शेत तणविरहित ठेवावे. ईश्वरी, कोटी या तणावर हा विषाणू जिवंत राहतो व तेथूनच किडीव्दारे पिकावर येतो. या तणाचा नाश करावा. पिकात जास्त नत्रखत देणे टाळावे, त्यामुळे पिकाची कायिक वाढ होते व किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.