ओवा पिकाचे क्षेत्र वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 06:31 PM2020-03-23T18:31:32+5:302020-03-23T18:31:38+5:30
अल्प प्रमाणात असलेले हे पीक आता राज्यात ४, हजार २०० हेक्टरवर वाढले आहे.
अकोला : ओवा मसाले पीक आहे. हे पीक राज्यात आपत्कालीन पीक म्हणून पेरणी केली जाते; परंतु आता नियमित पेरणीवर भर दिल्या जात असून, पश्चिम विदर्र्भातील खारपाणपट्ट्यत हा प्रयोग यशस्वी झाला आहे. प्रतिक्विंटल १० ते ११ हजार रुपये दर या पिकाला मिळत असल्याने शेतकरीही या पिकाकडे वळत आहेत. म्हणूनच अल्प प्रमाणात असलेले हे पीक आता राज्यात ४, हजार २०० हेक्टरवर वाढले आहे. यातील सर्वाधिक ४ हजार हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे.
ओवा मसाले पीक आता नगदी पिकाचे, इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन व उत्पन्न जास्त आहे. ओवा पीक तसे उत्तर प्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सरासरी ८ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल भाव व उत्पादन खर्च कमी आणि पेरणी ते काढणीपर्यंत एकरी खर्च ७ ते ८ हजार असल्याने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी या पिकाची कास धरली आहे. गत दोन वर्षापूर्वी दीड हजार हेक्टर असलेले हे क्षेत्र पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम व अमरावती या चार जिल्ह्यात चार हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील गंगाखेड, बीड, नांदेड, जळगाव खान्देश, धुळे, नंदुरबार जिल्ह्यतील शेतकरीही आता हे पीक घेत आहेत. विशेष म्हणजे हे पीक वन्य प्राणी, जनावरे खात नसल्याने नुकसान यापासून नुकसान होत नाही.
मूग, उडिदाच्या क्षेत्रावर आपत्कालीन पीक म्हणून आॅगस्ट महिन्यात ओवा पीक लावगड करण्यात येते; परंतु डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याने आता हे पीक आॅक्टोबर महिन्यात घेतले जाते; परंतु यासाठी सिंचनाची गरज आहे. गतवर्षी पाऊस, धुके याचा परिणाम ओव्यावर झाला आहे. त्यामुळे एकरी तीन क्विंटलचा उतारा आला. दोन वर्षापूर्वी राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकºयांना एकरी ३ हजार रुपये अनुदान देण्यात आले होते. आता हे अनुदान बंद झाले आहे.
- ओवा पिकाचे क्षेत्र वाढले आहे. पेरणी ते काढणीपर्यंतचा खर्च कमी आहे. चांगले दर आहेत. तसेही शेतकºयांनीही पिकांची फेरपालट करावी, म्हणजे पीक उत्पादन वाढण्यास मदत होईल.
डॉ. एस.एम. घावडे,
विभाग प्रमुख (शास्त्रज्ञ),
भाजीपाला संशोधन केंद्र,
डॉ. पंदेकृवि, अकोला.