राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १३ हजारांवर प्रकरणांचा निपटारा
By सचिन राऊत | Published: December 17, 2023 02:50 PM2023-12-17T14:50:33+5:302023-12-17T14:50:54+5:30
जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठेवण्यात आली होती.
अकोला : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, अकोला जिल्हा दिवाणी व फौजदारी न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एकाच दिवसात सुमारे १३ हजार ४६० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणद्वारे देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले प्रकरण राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठेवण्यात आले होते. यामधील १३ हजार ४६० प्रकरणांचा समन्वयाने निपटारा करण्याचा आला आहे. या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोटर वाहन कायदा, वाहन अपघात, एन आय ऍक्ट, ग्रामपंचायत घर कर, पाणी कर महावितरण संदर्भातील विविध प्रकरण तसेच बँकेत दाखल असलेल्या विविध प्रकरणांचा आपसात समझोता करून १९ करोड ६३ लाख ५९ हजार रुपये वसूल करण्यात आले.
यासह कौटुंबिक न्यायालय, सहकार न्यायालय, कामगार न्यायालय, दिवाणी न्यायालय व फौजदारी न्यायालयातील प्रकरणांचा ही निपटारा करण्यात आला.