१५ हजार वराह होणार हद्दपार!

By admin | Published: November 27, 2015 01:52 AM2015-11-27T01:52:51+5:302015-11-27T01:52:51+5:30

१५ दिवसांत शहराबाहेर काढण्याचे आयुक्तांचे निर्देश

Over 15 thousand boats will be expelled! | १५ हजार वराह होणार हद्दपार!

१५ हजार वराह होणार हद्दपार!

Next

अकोला : शहरात वराहांची संख्या मोठी आहे. रस्त्याच्या मधून जाणार्‍या वराहांमुळे अपघाताची शक्यता तर राहतेच, पण त्यापेक्षा स्वाइन फ्लूसारख्या आजारांची शक्यताही वाढली आहे. याबाबत महापौर आणि नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनंतर शहरातील १५ हजारांवर वराह शहराबाहेर काढण्याचे नियोजन महापालिका प्रशासन करीत आहे. अकोला शहरात २00 कुटुंबांकडून वराहपालनाचा व्यवसाय केला जातो. या वराहांच्या झुंडी शहरात सर्वत्र फिरताना दिसतात. ते रस्त्याच्या मधून जात असताना वाहनांचा अपघात झाल्यामुळे अनेकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापतीस सामोरे जावे लागले आहे. वराहांच्या झुंडीमुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पाहावयास मिळते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी वराहपालनाचा व्यवसाय शहराबाहेर करण्याचा आदेश आयुक्तांनी गुरुवारी वराह पालक-मालकांना दिला. त्यांनी यासाठी १५ दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यानंतर प्रशासनातर्फे सक्तीने वराह शहराबाहेर काढण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Web Title: Over 15 thousand boats will be expelled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.