30 हजारांवर नागरिक ठरले कोरोनावर भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:18 AM2021-04-21T04:18:17+5:302021-04-21T04:18:17+5:30
अकाेला : अकाेल्यात सात एप्रिल २०२० राेजी पहिला काराेना रुग्ण आढळून आल्यानंतर काराेना विषाणूची सुरू झालेली दहशत दिवसेंदिवस ...
अकाेला : अकाेल्यात सात एप्रिल २०२० राेजी पहिला काराेना रुग्ण आढळून आल्यानंतर काराेना विषाणूची सुरू झालेली दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. मध्यतंरी काेराेना सपंला असे दिलासादायक चित्र असतानाच काेराेना संसर्गाची दुसरी लाट आली अन् कोराेनाचे थैमान पूर्वीच्या तुलनेत आणखी वाढले आहे. सध्या तर रुग्णालयात जागा नाही, औषधोपचार नाही, इंजेक्शन नाही अशी नकारात्मक स्थिती असतानाही तब्बल ३० हजारांवर रुग्णांनी कोराेनावर मात करून काेराेनाला हरविण्यात यश मिळविले आहे.
काेराेनावर मात करण्यासाठी प्रशासनाने ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट यासाेबतच मास्क वापरा, अंतर पाळा, हात धुवा या त्रिसूत्रीवर अधिक भर दिल्याने रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ३० हजारांवर पाेहोचले आहे. तब्बल ३० हजार ६५० नागरिकांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत बरे झाले आहेत. प्रबळ इच्छाशक्ती, योग्यवेळी औषधोपचार, प्रशासनासह आरोग्य विभागाचे प्रयत्न यासोबतच कोरोनाला हरविण्याची जिद्द यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे कोरोना नाही तर आपणच भारी, असा विचार करून कोरोना आजारावरही विजय मिळविता येतो, हे या सर्वांनी दाखवून दिले आहे.
मागील वर्षभरापासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मार्च २०२१ मध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाची दहशत कायम नागरिकांच्या मनात घर करून आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कोरोनाने धडक दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासन, तसेच आरोग्य प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून यावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरू केले.
वर्षभरात २ लाखांवर रुग्णांनी काेराेना लक्षणांची तपासणी करून घेतली. यामध्ये ३४ हजार १४९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे, अशी बाधा हाेणाऱ्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न वापरणे, तसेच बेफिकिरी कारणीभूत ठरली आहे. याेग्य वेळी उपचारासाठी दाखल झाल्याने अनेकांना काेराेनावर मात करणे शक्य झाले आहे वेळीच औषधोपचार, डाॅक्टरांचे शर्थीचे प्रयत्न, तसेच प्रशासनाने सुचविलेल्या उपाययोजना यासाठी कामी आल्या आहेत.
काेट...
कोविडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, लक्षणे दिसताच नागरिकांनी कोविड चाचणी करून उपचारास सुरुवात करावी. प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यास उशिरा उपचारास सुरुवात झाल्याने रुग्ण उपचारास प्रतिसाद देत नाही. तोपर्यंत रुग्णाच्या फुप्फुसावरील इन्फेक्शन आणि ऑक्सिजनची पातळी खालावते. त्यामुळे हलगर्जी जिवावर बेतू शकते.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला
बाॅक्स...
गृहविलगीकरणातील रुग्णांनी घ्यावी काळजी
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा चार हजारांपेक्षा जास्त आहे. यापैकी सुमारे १५०० रुग्ण रुग्णालये, तसेच संस्थात्मक विलगीकरणात आहेत. उर्वरित सर्वच रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. या रुग्णांनी आयसाेलेशनमध्येच राहणे अपेक्षित आहे. त्यांच्यामुळे घरातील, तसेच शेजारी कुणालाही संसर्ग हाेणार नाही याची काळजी रुग्णांनी घेतली तर कोराेनाच्या प्रसाराला अटकाव हाेऊ शकेल
पाॅइंटर.....
आता सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल ३४२०१
मयत-५६७
डिस्चार्ज-२८९६१
ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह-४६७३