दहा हजार रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:22 AM2021-01-16T04:22:00+5:302021-01-16T04:22:00+5:30
सर्वोपचार रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची समस्या अकोला : सर्वोपचार रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. गत वर्षभरापासून येथील कर्मचाऱ्यांना पिण्याचे ...
सर्वोपचार रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची समस्या
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. गत वर्षभरापासून येथील कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी घरूनच आणावे लागत आहे. कर्मचाऱ्यांसह रुग्णांच्या नातेवाइकांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवत असल्याचे चित्र दिसून येते.
लसीकरण मोहिमेंतर्गत जीएमसीत बॅकअप सेंटर
अकोला : अकोल्यात शनिवारपासून कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा स्त्री रुग्णालयासह सर्वोपचार रुग्णालय आणि ऑर्बिट रुग्णालय सज्ज झाले आहे. लसीकरणानंतर एखाद्या लाभार्थ्याच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यास त्यांना तात्काळ उपचार मिळावा, या अनुषंगाने सर्वोपचार रुग्णालयात बॅकअप सेंटर तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी अशा रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली.
शहरात डासांचा प्रादुर्भाव
अकोला : शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक भागात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत जनजागृती अभियानदेखील राबविण्यात येत आहे. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी पाण्याचे भांडे नियमित स्वच्छ धुवावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, तसेच मच्छरदानीचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.