हद्दवाढीचा चेंडू शासनाच्या कोर्टात

By admin | Published: February 19, 2016 02:15 AM2016-02-19T02:15:05+5:302016-02-19T02:15:05+5:30

अकोला मनपा आयुक्तांकडून अहवाल सादर; शासन काढणार अधिसूचना.

Overlord ball court in court | हद्दवाढीचा चेंडू शासनाच्या कोर्टात

हद्दवाढीचा चेंडू शासनाच्या कोर्टात

Next

अकोला: महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांनी १ जूनची मुदत दिल्यानंतर मनपा आयुक्त अजय लहाने यांनी तातडीने संचालक नगर रचनाकार (पुणे) यांच्यामार्फत प्रस्तावाची प्रक्रिया पूर्ण करीत गुरुवारी नगर विकास विभागाकडे हद्दवाढीचा प्रस्ताव सादर केला. प्रस्तावाची छाननी केल्यानंतर पुढील आठवड्यात शासनाकडून प्राथमिक अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. २00१ मध्ये महापालिका अस्तित्वात आल्यानंतर मनपा हद्दवाढीचा पहिला प्रशासकीय प्रस्ताव २00२ मध्ये शासनाकडे सादर करण्यात आला होता. तत्कालीन आयुक्त डॉ. लक्ष्मीकांत देशमुख,चंद्रशेखर रोकडे, डॉ. विपीन कुमार शर्मा यांनीसुद्धा हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याची औपचारिकता पूर्ण केली. यामध्ये मनपा क्षेत्रालगतच्या सुमारे २१ गावांचा समावेश करण्याचे प्रस्तावित आहे. मनपा प्रशासनाच्या वतीने अकोलेकरांना रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधा दिल्या जात असल्या तरी या सुविधांवर शहरानजीकच्या गावांचा ताण पडत असल्याची परिस्थिती आहे. हद्दवाढ झाल्यास मालमत्तांच्या संख्येत वाढ होऊन त्यापासून मनपाला महसूल प्राप्त होऊ शकतो. यादरम्यान, शहरासह २१ गावांमधील लोकसंख्येची माहिती सादर करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने मनपाला दिले होते. त्यानुषंगाने मनपाचा नगर रचना विभाग कामाला लागला. शहरालग तच्या गावांचे नकाशे, शहराला जोडल्या जाणार्‍या सीमा, गावांतील लोक संख्या, त्यांचे दरडोई उत्पन्न आदी इत्थंभूत बाबींचा अहवाल मनपाने तयार करून जिल्हाधिकार्‍यांमार्फत अमरावती विभागीय कार्यालय आणि तेथून नगर रचना संचालनालय (पुणे)कडे पाठविण्यात आला. हद्दवाढीचा प्रस्ताव १ जूनपर्यंंत सादर करण्याचे राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी निर्देश दिल्यानंतर आयुक्त अजय लहाने यांनी प्रस्तावाचा पाठपुरावा केला. गुरुवारी नगर विकास विभागाकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला.

Web Title: Overlord ball court in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.