परदेशात गाडी चालविण्याच्या परवान्याचेही होऊ शकते नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:20 AM2021-08-29T04:20:54+5:302021-08-29T04:20:54+5:30

अकाेला : परदेशात वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना असणे गरजेचे असते. विदेशात तर हे नियम अत्यंत कडक आहेत; मात्र मुदत ...

Overseas driving license can also be renewed | परदेशात गाडी चालविण्याच्या परवान्याचेही होऊ शकते नूतनीकरण

परदेशात गाडी चालविण्याच्या परवान्याचेही होऊ शकते नूतनीकरण

Next

अकाेला : परदेशात वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना असणे गरजेचे असते. विदेशात तर हे नियम अत्यंत कडक आहेत; मात्र मुदत संपलेले परवान्यांचे नूतनीकरण आरटीओ कार्यालयातही होते. अकाेला आरटीओ कार्यालयात दरवर्षी परवान्यांची नूतनीकरणाची संख्या कमी असून, गेल्या पावणेदोन वर्षात फक्त ३५ जणांनी परवान्यांचे नूतनीकरण केले आहे. दरम्यान, नूतनीकरणासाठी मात्र नवा परवाना काढण्याएवढीच प्रक्रिया करावी लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, परदेशात वाहने चालविण्याचे परवाने काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. स्थानिक वाहन परवाना काढण्यासाठी ज्याप्रमाणे ऑनलाइन अर्ज करावा लागतो, त्याप्रमाणे परदेशी वाहन परवान्यांच्या नूतनीकरणासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर नागरिकांना आरटीओ कार्यालयातर्फे तारीख दिली जाते. त्या तारखेला आरटीओ कार्यालयात जाऊन त्या नागरिकांनी मूळ पासपोर्ट, व्हिसा आणि वाहन परवाना दाखविणे गरजेचे आहे. तसेच मूळ वाहन परवान्यावरील पत्ता व पासपोर्टचा पत्ता हा एकच असणे आवश्यक आहे. यावेळी आरटीओ विभागातर्फे संबंधित नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून नूतनीकरण केले जात आहे. नूतनीकरणासाठी १००० रुपयांचे शुल्क आकारण्यात येत आहे.

असा काढावा आंतरराष्ट्रीय परवाना

- परदेशात वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आरटीओ नियमानुसार ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.- ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, शुल्कदेखील ऑनलाइनच भरणे गरजेचे आहे. त्यानंतर शुल्क भरल्याची प्रिंट काढून आरटीओ कार्यालयात सादर करावी लागते. आरटीओ कार्यालयाकडे पासपोर्ट, व्हिसा आणि वाहन परवाना दाखवावा लागतो. मात्र, ही कागदपत्रे दाखविण्यासाठी मूळ कागदपत्रे घेऊन जाणे गरजेचे आहे.

- यानंतर आरटीओ कार्यालयाकडून या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते. त्यानंतर संबंधित नागरिकाला एका वर्षाच्या मुदतीसाठी परवाना देण्यात येत आहे.- एका वर्षाचा परवाना संपल्यानंतर, पुन्हा नव्याने अर्ज करून हा परवाना काढावा लागतो.

कोण काढू शकतो हा परवाना

- ज्या नागरिकांकडे परदेशात राहण्याचा व्हिसा व पासपोर्ट आहे, अशा नागरिकांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो.- वाहन परवाना देताना आरटीओ प्रशासनातर्फे संबंधित नागरिकाचे मूळ लायसन्स पाहूनच पुढील प्रक्रिया केली जाते.

- मूळ वाहन परवान्यावरील पत्ता व पासपोर्टवरील पत्ता हा एकच असणे गरजेचे आहे. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, एका दिवसात हा वाहन परवाना दिला जातो.

आरटीओ कार्यालयातर्फे परदेशात गाडी चालविण्यासाठी परवान्याच्या नूतनीकरणासाठी नवा परवाना काढण्याच्या नियमाप्रमाणे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. संबंधित नागरिकांकडे अगोदरचे लायसन्स असल्यामुळे पुन्हा त्यांची कुठलीही परीक्षा घेतली जात नाही. तसेच इतर सर्वसाधारण लायसन्सप्रमाणे नियमानुसार शुल्क आकारले जाते.

ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकाेला

कोरोनाकाळात संख्या घटली

२०१८ - २३

२०१९ - २२

२०२० - ०७

२०२१- ०६

Web Title: Overseas driving license can also be renewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.