जालन्यातून मागविणार ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:18 AM2021-04-02T04:18:58+5:302021-04-02T04:18:58+5:30

अकोला: कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल, तरच व्यावसायिकांना प्रतिष्ठान सुरू ठेवता येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानुसार, अनेक ...

Oxygen to be ordered from the combustion | जालन्यातून मागविणार ऑक्सिजन

जालन्यातून मागविणार ऑक्सिजन

Next

अकोला: कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल, तरच व्यावसायिकांना प्रतिष्ठान सुरू ठेवता येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानुसार, अनेक व्यावसायिकांनी काेविड चाचण्या केल्या आहेत. यामध्ये निगेटिव्ह आल्यानंतरही अनेक व्यावसायिकांकडून बेफिकरी बाळगण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार कोरोनाच्या फैलावासाठी कारणीभूत ठरत आहे.

तापमानात वाढ, डोकेदुखीच्या समस्या वाढल्याअकोला: मागील दोन दोवसांपासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर गेला आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे अनेकांना डोकेदुखी, अंगदुखीसह नेत्र विषयक समस्या उद्भवू लागल्या आहेत. यातील बहुतांश लक्षणे ही कोविडची असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.

रॅपिडमध्ये निगेटिव्ह, आरटीपीसीआरमध्ये पॉझिटिव्ह

अकोला: अहवाल लवकर मिळतो म्हणून अनेक जण रॅपिड ॲन्टीजन चाचणी करताना दिसून येत आहेत, मात्र लक्षणे असूनही ते निगेटिव्ह येत असल्याने काही लोक आरटीपीसीआर चाचणीचा आधार घेत आहेत. यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने रुग्णांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे.

Web Title: Oxygen to be ordered from the combustion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.