हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्लांट जिल्ह्यातील रुग्णांसाठी वरदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:24 AM2021-04-30T04:24:10+5:302021-04-30T04:24:10+5:30
अकोला : कोरोना काळात जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याकरिता अकोल्याच्या एमआयडीसीमधील नैसर्गिक हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्रकल्प ...
अकोला : कोरोना काळात जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याकरिता अकोल्याच्या एमआयडीसीमधील नैसर्गिक हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्रकल्प (प्लांट) सध्या वरदान ठरत आहे. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे व अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) डाॅ. नीलेश अपार यांनी गुरुवारी ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोरोना बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरची मागणीही वाढली. त्यामध्ये अकोल्यातील माउली उद्योगाच्या नैसर्गिक हवेतून ऑक्सिजन तयार करण्याच्या प्लांटमधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना रुग्णांसाठी दररोज ५०० ते ५५० ऑक्सिजन सिलिंडर तसेच वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांतील रुग्णांसाठी प्रत्येकी १०० असे एकूण ७०० ते ७५० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या लिक्वीड ऑक्सिजनचा वापर न करता, नैसर्गिक हवेतून तयार केलेल्या ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा या प्लांटमधून करण्यात येत आहे. या प्लांटमधून होणार ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी गुरुवारी या प्लांटला भेट देऊन नैसर्गिक हवेतून ऑक्सिजन तयार करण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी ऑक्सिजन प्लांटचे किशोर तळोकार व त्यांचा मुलगा अनिकेत तळोकार उपस्थित होते. त्यांनी आरडीसी व एसडीओंना हवेतून ऑक्सिजन तयार करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली.
.....................................फोटो..........................