श्वास गुदमरण्याआधीच उपलब्ध व्हावा ऑक्सिजन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:18 AM2021-04-24T04:18:10+5:302021-04-24T04:18:10+5:30
राजेश शेगाेकार अकोला : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. एकीकडे ...
राजेश शेगाेकार
अकोला : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. एकीकडे रुग्णांची संख्या व उपलब्ध खाटा यांचा ताळमेळ जुळविताना दमछाक होत असलेल्या आरोग्य यंत्रणेसमोर आता ऑक्सिजनच्या टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. सध्या जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी दुपटीने वाढली असून, त्यामध्ये आणखी वाढ होण्याचीच चिन्हे आहेत. अशा स्थितीमध्ये रुग्णांचा श्वास गुदमरण्याआधीच ऑक्सिजन उपलब्धता करावी लागणार आहे.
अकोल्यात ऑक्सिजन निर्मितीचे दोन प्लांट असून, त्यामार्फत सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन गॅसचा पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे लगतच्या वाशिमलाही अकोल्यातूनच पुरवठा केला जात असल्याने सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या वाढली असून, ऑक्सिजनची मागणीदेखील वाढली आहे. गुरुवारी रात्री खासगी रुग्णालयात ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण झाली होती. अशीच स्थिती एक दिवसाआड उद्भवत आहे.
बाॅक्स....
अकाेल्याला पाहिजे ११ के.एल.ऑक्सिजन
शासकीय रुग्णालयांसाठी होणारा ऑक्सिजनच्या पुरवठा तसेच खासगी रुग्णालयांची गरज लक्षात घेता अकोला जिल्ह्यासाठी आठवड्यातून किमान चार टँकर लिक्वीड मिळणे अत्यावश्यक आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमधून ऑक्सिजनची मागणी माेठ्या प्रमाणात वाढली असून किमान ११ के.एल (किलाे लिटर) ऑक्सिजन आवश्यक आहे.
बाॅक्स......
अकाेल्यावर वाशिमचा भार
वाशिम जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवण्याचा भार अकाेल्यावर टाकण्यात आला आहे. वाशिमला दरराेज ८ डयुरा................. ऑक्सिजन द्यावा लागत आहे. एक डयुरा.............. मध्ये ऑक्सिजनचे २५ सिलिंडर मावतात. वाशिमची गरज लक्षात घेता अकाेल्याला हाेणाऱ्या पुरवठ्यात अडचणी येत आहेत.
बाॅक्स...
वाढत्या काेविड सेंटरचाही फटका
काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता काेविड सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्याचे प्रमाणही गतवेळच्या तुलनेत वाढले आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम ऑक्सिजनच्या मागणीवरही झाला आहे
०२
सध्या अकोल्यात एअर ऑक्सिजन निर्मितीचा एक प्लांट औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू आहे. या प्लांटमधून अकोल्यासह व बुलडाणा व वाशिममधील शासकीय वैद्यकीय दवाखान्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. तसेच कंत्राट या प्लांटला देण्यात आले आहे.
असे तयार हाेते ऑक्सिजन
ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी लागणारे लिक्वीड हे नागपूर येथून बोलविण्यात येते. या लिक्वीड चा एक टँकर हा ८ किलो लीटर क्षमतेचा असतो. हे लिक्वीड कॉम्प्रेस करून ऑक्सिजनन तयार केले जाते. एका टँकरमधून तयार केलेल्या ऑक्सिजनमध्ये साधारणपणे ९०० ते ९५० सिलिंडर भरले जातात. सद्यस्थितीत लिक्वीडचा पुरवठा करण्याºया प्लांटवरही ताण वाढला असल्याने मागणीची पूर्तता होण्यात अडचणी येत आहेत. नागपूरनंतर लिक्वीड तयार करणारे असे प्लांट पुणे, ठाणे येथेच आहेत.
काेट...
अकाेला शहरातील काेराेना रूग्णांची स्थीती लक्षात घेता शहरातील खासगी रूग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. ही मागणी पुर्ण करण्यासाठी शहराला अतिरिक्त साठा मिळणे गरजेचे आहे
-डॉ. स्वप्निल ठाकरे,
आॅक्सिजन पुरवठादार
काेट...
शहरात ऑक्सिजनची आणीबाणी निमार्ण हाेणार नाही यासाठी प्रशासन दक्ष असून पुणे येथूनही आपण लिक्वीड ऑक्सिजन मागविले आहे. ऑक्सिजन उपलब्ध हाेण्यासाठी प्रशासनस्तरावर प्राधान्याने लक्ष दिले जात आहे.
संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी अकाेला
पाईटर
गेतवेळेची मागणी ७ के.एल
आताची मागणी ११ के.एल
एकूण रूग्ण
ॲक्टीव्ह रूग्ण
बरे झालेले रूग्ण