लसीकरणाची कासवगती; दररोज गरज १५ हजार डोसची, मिळतात केवळ तीन हजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:20 AM2021-05-11T04:20:01+5:302021-05-11T04:20:01+5:30
१० शहरांत केवळ ९ केंद्रे सुरू कोविड लसीकरण मोठ्या उत्साहात सुरू असले, तरी लसीअभावी जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंंद्रे बंद ...
१० शहरांत केवळ ९ केंद्रे सुरू
कोविड लसीकरण मोठ्या उत्साहात सुरू असले, तरी लसीअभावी जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंंद्रे बंद आहेत. महापालिका क्षेत्रात ९ केंद्रे सुरू असले, तरी त्यापैकी बहुतांश केंद्रांवर ४५ वर्षांखालील लाभार्थींनाच लस उपलब्ध आहे. त्यामुळे केवळ ऑनलाइन नोंदणी केलेल्या लाभार्थींनाच लस उपलब्ध हाेत आहे. मात्र, ते देखील मोजक्याच लाभार्थींना मिळत आहेे.
आतापर्यंतचे लसीकरण - २,३१,४९२
पहिला डोस - १,८९,१२४
दुसरा डोस - ४२,३६८
एकूण रुग्ण - ४६,२७६
कोरोनामुक्त -३९०१२
लसीकरण
ज्येष्ठ नागरिक
४५ ते ६० वयोगट - ८९,४४०
१८ ते ४५ वयोगट -२९,५४६
नागरिक वैतागले
कोविड लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे, मात्र लस बुकिंगचा प्रयत्न विफल ठरत आहे. दररोज बुकिंगचा प्रयत्न करूनही लस मिळत नसल्याने हताश झालो आहे.
- विशाल वंजारे, युवक
लसीकरणाच्या बुकिंगसाठी दररोज ५ वाजताच्या सुमारास लॉगइन करतो. लस बुकिंग सुरू होताच १० सेकंदांत केंद्रच बुक झाल्याचे दाखवते. नेमकं चाललं काय, हेच कळत नाही.
- सचिन पडोळे, युवक
मोजकीच लसीकरण केंद्रे आणि लसीचे अत्यल्प डोस यामुळे लस मिळत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे प्रशासनाने लसीकरण केंद्रे वाढवावी, जेणेकरून लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळणे शक्य होईल व जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण होईल.
- विलास पाटील, युवक
४५ वर्षांआतील लाभार्थींसाठी पाच केंद्र
महापालिका क्षेत्रात नऊ लसीकरण केंद्र सुरू असून, यापैकी पाच केंद्रे हे ४५ वर्षांआतील लाभार्थींसाठी खुली असणार आहे. यामध्ये जीएमसी, कस्तुरबा गांधी रुग्णालय, कृषीनगर नागरी आरोग्य केंद्र, आरकेटी कॉलेज, सिंधी कॅम्प नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. तसेच उर्वरित भरतीय रुग्णालय, हरिहरपेठ नागरी आरोग्य केंद्र, आरकेटी रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय आदी केंद्रांवर ४५ वर्षांवरील लाभार्थींचे लसीकरण होणार आहे.
लसीकरण ९ पासून लाइन सकाळी ६ वाजतापासूनच
शहरातील लसीकरण केंद्रांवर सकाळी ९ वाजता लसीकरणास सुरुवात हाेते, मात्र लवकर लस मिळावी म्हणून लाभार्थी सकाळी ६ वाजतापासूनच लसीकरण केंद्राबाहेर लांबलचक रांगा लावत असल्याचे चित्र दिसून येते. या प्रकारामुळे कोरोना संसर्गाच्या फैलावाचीही दाट शक्यता आहे.