लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:20 AM2021-07-29T04:20:27+5:302021-07-29T04:20:27+5:30

अद्याप पहिला डोसही मिळेना... लसीचा पहिला डोस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. आतापर्यंत अनेकदा प्रयत्न केले, मात्र ...

The pace of vaccination; It can take up to two years for everyone to get both doses! | लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे!

लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे!

Next

अद्याप पहिला डोसही मिळेना...

लसीचा पहिला डोस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. आतापर्यंत अनेकदा प्रयत्न केले, मात्र स्लॉट बुक होत नाही. लसीकरण केंद्रावर कूपनच्या माध्यमातून लस घेण्याचा प्रयत्न केला, तर कूपन देखील मिळाले नाही. त्यामुळे आतापर्यंत लसीचा एकही डोस मिळाला नाही.

- विशाल वंजारे, नागरिक

लसीकरण का वाढेना

लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर अनेकदा लसीचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना लसीचा पहिला डोसही मिळाला नाही. दुसरीकडे लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांपैकी अनेकांनी लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय असली, तरी दुसरा डोस केवळ ९.१२ टक्के लोकांनीच घेतल्याचे दिसून येत आहे. लसीचा तुटवडा आणि दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये उदासीनता यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- एकूण संख्या - पहिला डोस - झालेले प्रमाण (टक्के) - दुसरा डोस - झालेले प्रमाण (टक्के)

आरोग्य कर्मचारी - १४,८०० - १२,०२५ - ८१.२५ - ७,६९८ - ५२.०१

फ्रंटलाइन वर्कर्स - १३,९९३ - १२,८१५ - ९१.५८ - ८,०२८ - ५७.३७

१. ते ४५ वयोगट - ८,४७,५२६ - १,२८,१३८ - १५.१२ - १३,३८८ - १.५८

- ४५ ते ५९ - ४,०७,९८८ -१,३२,२९७ - ३२.४३ - ६१,२४७ - १५.०१

६० पेक्षा जास्त - १,९७,३८८ - ९९,५८४ - ५०.४५ - ४४,७७७ - २२.६८

गुरुवारी एकाच केंद्रावर होणार लसीकरण

सद्यस्थितीत जिल्ह्यात लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे मोजक्याच केंद्रांवर लसीकरण होत आहे. गत आठवडाभरात सरासरी सहा केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली, मात्र लस उपलब्ध नसल्याने गुरुवारी एकाच केंद्रावर लसीकरण होणार आहे. जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहीम राबविताना आरोग्य यंत्रणेची मोठी कसरत होताना दिसून येत आहे.

Web Title: The pace of vaccination; It can take up to two years for everyone to get both doses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.