पॅकेजच्या गायी वाटपात घोळ!

By admin | Published: January 26, 2015 12:36 AM2015-01-26T00:36:18+5:302015-01-26T00:46:17+5:30

सात वर्षांपासून चौकशी गुलदस्त्यात.

Package cows distributed! | पॅकेजच्या गायी वाटपात घोळ!

पॅकेजच्या गायी वाटपात घोळ!

Next

अकोला: विदर्भातील शेतकर्‍यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विशेष पॅकेजअंतर्गत करण्यात आलेल्या गायी वाटपात प्रचंड घोळ झाला असून, अकोला जिल्हय़ातील या घोळाची चौकशी गत सात वर्षांपासून गुलदस्त्यात आहे.
नापिकी, कर्जबाजारीपपणाला कंटाळून विदर्भातील शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्येचे हे सत्र गत सात वर्षांत प्रचंड वाढले. शेतकर्‍यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन केंद्र शासनाने पंतप्रधान, तर राज्य शासनाने विशेष मुख्यमंत्री पॅकेज दिले होते. केंद्र आणि राज्य मिळून जवळपास पावणे पाच हजार कोटींचे हे पॅकेज होते. या पॅकेजमुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यात आले होते. याशिवाय शेती विकासाच्या योजनांसह शेतकर्‍यांना जोडधंद्यांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या. विदर्भ विकास पॅकेजांतर्गत विदर्भातील ११ जिल्हय़ात प्रत्येकी एक हजार गायींचे वाटप पन्नास टक्के अनुदानावर करण्यात आले होते; पण अनेक ठिकाणी या गायी कागदोपत्रीच वाटप करू न शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अकोला जिल्हय़ात हे वास्तव समोर आले आहे. या जिल्हय़ातील प्राथमिक दूध उत्पादक संस्थांच्या सभासदांना एक हजार गायींचे वाटप करण्यात आले; परंतु यातील अनेक संस्थांनी कागदोपत्री गायी खरेदी केल्याचे भासवून अनुदानाची रक्कम हडप केल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. यासंदर्भात तत्कालीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी व साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (पदूम) अकोला यांनी संयुक्तरीत्या चौकशी करू न अहवाल दिला आहे.
या अहवालात अकोला जिल्हय़ातील मूर्तिजापूर तालुक्यात सहा संस्थांच्या माध्यमातून ४१ गायी खरेदीच केल्या नसल्याचे चौकशीअंती आढळून आले आहे. तसेच बाश्रीटाकळी तालुक्यातील तीन सहकारी संस्थांच्या माध्यमातून २६ गायी, तेल्हारा तालुक्यातील एका संस्थेने नऊ गायी, तर आकोट तालुक्यातील एका संस्थेच्या पाच गायी खरेदीच केल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
याबाबत संबंधित कार्यालयाने शासनाला अहवाल पाठविला होता. ज्या संस्थांनी गैरविनियोग केला, त्या रकमेची वसुली करण्यासाठी संबंधित संस्थांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे चौकशी अहवालात चौकशी अधिकार्‍यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात अकोल्याच्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी ८ फेब्रुवारी २00८ रोजी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाला या गायी वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
यासंदर्भात सहकारी संस्थेचे विभागीय उप निबंधक सचिन घोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विदर्भ विकास पॅकेजच्या गायी वाटपात अपहार झाल्याचे दोन चौकशी अहवाल प्राप्त झाले असल्याचे सांगीतले. परंतु या दोन्ही अहवालात प्रचंड तफावत असल्याने याची विशेष लेखा परीक्षकांकडून पुन्हा चौकशी करण्यासाठीचा पत्रव्यवहार केला असल्याचे सांगीतले.

Web Title: Package cows distributed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.