प्रहार जनशक्तीचं अकोल्यात 'जिवंत मुर्दे पूजा' आंदोलन, शासनाच्या धोरणाचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 04:30 PM2017-12-02T16:30:28+5:302017-12-02T16:30:34+5:30
सरकारच्या विविध धोरणांचा विरोध करण्यासाठी प्रहार जनशक्ति पक्षातर्फे अकोल्यात शनिवारी ‘जिवंत मुर्दे पूजा’ आंदोलन करण्यात आलं. हा अभिनव निषेध शनिवार, २डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला
अकोला - सरकारच्या विविध धोरणांचा विरोध करण्यासाठी प्रहार जनशक्ति पक्षातर्फे अकोल्यात शनिवारी ‘जिवंत मुर्दे पूजा’ आंदोलन करण्यात आलं. हा अभिनव निषेध शनिवार, २डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला. सध्या शेतकरी कर्जमाफी, जीएसटी, वाढत्या महागाईसह विविध मुद्यांवर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत आहे. अनेक राजकीय पक्षांनी मोर्चा, आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या संतापाला वाट मोकळी करुन देत आहेत. या पृष्ठभूमीवर प्रहार जनशक्ति पक्षातर्फे अभिनवपद्धतीने आंदोलन करण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पुढील प्रमुख माण्यासांठी आंदोलन करण्यात आले.
- शेतकऱ्यांच्यासाठीचा स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा.
- कापूस, सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने भरपाई देण्यात यावी.
- जिल्ह्यातील अपंग बांधवांना ३ टक्के निधी तातडीने खर्च करण्यात यावा व हा निधी खर्च न करणाºया अधिकाºयांवर कठोर कारवरई करण्यात यावी.
- अपंग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रत्येक तालुका समितीमध्ये समावेश करण्यात यावी, अपंगांना विना अट हक्काचे घरकुल देण्यात यावे.