अकोल्यातील चित्रकाराचे पेंटिंग श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात झळकणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 13:28 IST2018-12-18T13:27:55+5:302018-12-18T13:28:36+5:30
अकोला: येथील महिला चित्रकार मधुमती वऱ्हाडपांडे यांच्या ‘द लॉस्ट ड्रीम’ पेंटिंगची कोलंबो येथील जे.डी.जे. परेरा आर्ट गॅलरीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

अकोल्यातील चित्रकाराचे पेंटिंग श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात झळकणार!
अकोला: येथील महिला चित्रकार मधुमती वऱ्हाडपांडे यांच्या ‘द लॉस्ट ड्रीम’ पेंटिंगची कोलंबो येथील जे.डी.जे. परेरा आर्ट गॅलरीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
शोरंग आर्ट ग्रुपतर्फे २१ डिसेंबर २0१८ रोजी आयोजित केलेल्या भव्य ग्रुप शोमध्ये देश- विदेशातील अनेक नामवंत चित्रकार उपस्थित राहणार आहेत. या कलावंतांमध्ये अकोल्यातील मधुमती वºहाडपांडे यांच्या अब्स्टॅक्ट पेंटिंगची निवड झाल्याने अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. मुले मोठी झाल्यावर त्यांनी फावल्या वेळात हा छंद जोपासला. अकोल्यातील प्रसिद्ध आर्टिस्ट सतीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या चित्रकलेला योग्य दिशा मिळाली. चित्रकलेच्या कामात त्यांना नवनिर्मितीचा अवर्णनीय आनंद मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनानंतर लगेचच शोरंग ग्रुपतर्फे कोलंबो येथे दोन दिवस आर्ट कॅम्पचेसुद्धा प्रदर्शन होणार आहे. या कॅम्पमध्ये सहभागी होणाºया कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन २0१९ मध्ये बांग्लादेश येथे होणार आहे. (प्रतिनिधी)