सेतू अभ्यासक्र निर्मितीमध्ये पजई यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:19 AM2021-07-31T04:19:52+5:302021-07-31T04:19:52+5:30

बोरगाव मंजू : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची पूर्वतयारी, तसेच मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी हा उद्देश समोर ठेवून सेतू ...

Pajai's involvement in the creation of the Setu syllabus | सेतू अभ्यासक्र निर्मितीमध्ये पजई यांचा समावेश

सेतू अभ्यासक्र निर्मितीमध्ये पजई यांचा समावेश

Next

बोरगाव मंजू : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची पूर्वतयारी, तसेच मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी हा उद्देश समोर ठेवून सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून तज्ज्ञांचे विषयनिहाय गट तयार करून सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. त्यामध्ये प. ना. विद्यालयाचे शिक्षक विजय पजई यांनी विज्ञान विभागाकरिता सेतू अभ्यासक्रम निर्मितीचे काम केले आहे.

------------------

कवठा येथे अंधाराचे साम्राज्य

कवठा : ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे बाळापूर तालुक्यातील कवठा येथील काही भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.

-------------------

कवठा येथे नाल्या तुंबल्या

कवठा : ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे बाळापूर तालुक्यातील कवठा येथील नाल्यांमध्ये गाळ साचल्याने नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिक त्रस्त झाले आहे.

-------------------------

Web Title: Pajai's involvement in the creation of the Setu syllabus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.