पुलांवरील पथदिवे नादुरुस्तच!

By admin | Published: May 23, 2014 08:40 PM2014-05-23T20:40:04+5:302014-05-24T01:08:37+5:30

निमवाडी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील पूल, शहराच्या मध्यभागातील लोखंडी पूल, दगडी पूल तसेच आकोट फैल भागातील रेल्वे पुलावरील पथदिवे सतत नादुरुस्त असल्याची परिस्थिती आहे.

Pallav pathdiive poorly! | पुलांवरील पथदिवे नादुरुस्तच!

पुलांवरील पथदिवे नादुरुस्तच!

Next

निमवाडी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील पूल, शहराच्या मध्यभागातील लोखंडी पूल, दगडी पूल तसेच आकोट फैल भागातील रेल्वे पुलावरील पथदिव्यांची देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाकडे आहे. लोखंडी पूल, दगडी पूल वगळल्यास निमवाडी परिसरातील पूल व रेल्वे पुलावरून मोठ्या प्रमाणावर जडवाहतूक होते. तसेच शहरातील नागरिकांची मध्यरात्रीपर्यंत वर्दळ सुरूच असते. तरीसुद्धा या पुलांवरील पथदिवे सतत नादुरुस्त असल्याची परिस्थिती आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाला सूचना केल्यानंतर दोन दिवस पथदिवे सुरळीत होतात, त्यानंतर पुन्हा नादुरुस्त होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

** पूल असुरक्षित
निमवाडी भागातील पूल, लोखंडी पूल तसेच दगडी पुलाच्या खाली मृत जनावरे आढळून येतात. लोखंडी पुलाखाली बिनधास्तपणे पत्त्यांचा डाव रंगलेला दिसून येतो. पुलाखाली कचर्‍याचा भराव टाकल्या जात असल्याने नदीला येणार्‍या पुराला अडथळा निर्माण होतो. जलकुंभीमुळे सुद्धा पुराच्या पाण्यास अटकाव होत असल्याने सदर पाणी अनेकदा दगडी पुलावरून निघून जाते. यामुळे दगडी पूल असुरक्षित मानल्या जातो.

** लोखंडी पूल, दगडी पुलाचे कठडे कुचकामी
लोखंडी पूल तसेच दगडी पुलावरील कठडे कुचकामी आहेत. लोखंडी पुलावर सिमेंटचे कठडे बांधण्यात आले असून, दगडी पुलावर लोखंडी पाईप बसविण्यात आले आहेत. यापैकी लोखंडी पुलावरील सिमेंटचे कठडे जुने व जीर्ण झाले आहेत. काही कठड्यांना तडे गेले असून, ते कोसळण्याच्या स्थितीत आहेत. मोठ्या लोखंडी पुलावर पादचार्‍यांसाठी फुटपाथची व्यवस्था असल्याने यावरून बच्चे कंपनीसह वयोवृद्ध नागरिक मार्गक्रमण करतात. यामुळे लोखंडी पुलावरील सिमेंटचे कठडे तातडीने दुरुस्त करणे गरजेचे झाले आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत दगडी पुलावर मोठी गर्दी असते. या पुलावरील लोखंडी पाईप अतिशय कुचकामी असल्याचे लक्षात येते. सदर कठडे तत्काळ बदलण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Pallav pathdiive poorly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.