पैलपाडा ग्रामपंचायत करणार मुलींच्या जन्माचे स्वागत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:19 AM2021-03-10T04:19:48+5:302021-03-10T04:19:48+5:30
जागतिक महिला दिना (८ मार्च) निमित्त पैलपाडा ग्रामपंचायतीतर्फे गावातील आशा सेविका यांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक महिलेला मास्कचे वाटप करण्यात ...
जागतिक महिला दिना (८ मार्च) निमित्त पैलपाडा ग्रामपंचायतीतर्फे गावातील आशा सेविका यांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक महिलेला मास्कचे वाटप करण्यात आले. महिला घराबाहेर पडल्या तर प्रत्येक महिलेच्या तोंडाला मास्क दिसणार आहे. या उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
एकीकडे कन्यारत्न प्राप्त होणाऱ्या दाम्पत्याचे गावात स्वागत करीत असताना गावातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना गावातच इंग्रजीचे शिक्षण मिळावे, यासाठी केजी वर्ग सुरू करण्याचा ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा गौड, उपसरपंच गणेश मापारी यांचा प्रयत्न आहे. गावातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जावे लागते. ही बाब लक्षात घेऊनच गावातच विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पूर्ण प्रयत्न करणार आहे.
महिलांना मास्कचे वाटप
जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत सदस्या दीपाली भारसाके, सुनीता खंडारे, आशा सेविका मंजू वानखडे, प्रजापती खंडारे यांनी मास्क वाटप केले.
फोटो :