पळसोद गावकरी ग्रामसेवकाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:20 AM2021-03-09T04:20:49+5:302021-03-09T04:20:49+5:30
गोरगरीब जनतेची लूट करू नका अकोट : कोविड-१९ चा गैरफायदा घेऊन कोणी जीवनाश्यक साहित्यांची चढ्या दराने विक्री करून सामान्य ...
गोरगरीब जनतेची लूट करू नका
अकोट : कोविड-१९ चा गैरफायदा घेऊन कोणी जीवनाश्यक साहित्यांची चढ्या दराने विक्री करून सामान्य गोरगरीब जनतेची लूट करत असेल तर त्यांना धडा शिकविणार, असा इशारा छावा संघटना तालुका प्रसिद्धीप्रमुख ज्ञानेश्वर पाटिल मानकर यांनी दिला आहे.
प्रशासनात समन्वयाचा अभाव
अकोटः शासनाकडून कोविड व्हॅक्सिन प्रत्येक शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु प्रशासनाकडून जनजागृती व समन्वयाचा अभाव असल्याने गरजूंना व्हॅक्सिनचा लाभ मिळत नाही. प्रशासनाने सदर बाब गांभीर्याने घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची मागणी शहर संघटक रोशन पर्वतकर यांनी केली आहे.
खिरपुरी येथील जुगारावर छापा
बाळापूर : दहशतवादविरोधी पथकाने खिरपुरी बु. येथे रविवारी छापा घालून वरली जुगार खेळणारे अनिल ज्ञानदेव इंगळे (२८), एकनाथ देवलाल गोंडचवर (३९) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
जामठी बु. येथे कोरोना लसीकरण प्रारंभ
जामठी बु.: प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी ज्येष्ठ नागरिकांच्या कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष पी. एन. बोळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही. जी. निलखन, सेवानिवृत्त प्राचार्य जी. आर. चांडक यांनी लसीकरण करून घेतले. पहिल्याच दिवशी २८ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली. वैद्यकीय अधिकारी डाॅ. शेगोकार, डाॅ. पोकळे, डाॅ. हरणे, डाॅ. सैयद उपस्थित होते.
फोटो: