जिभेचे लाड पुरवताय की टायफाईडला निमंत्रण देताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:23 AM2021-08-14T04:23:18+5:302021-08-14T04:23:18+5:30
कोविडच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने चौपाटीवर, रस्त्याच्या कडेला उघड्यावरच खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत. ...
कोविडच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने चौपाटीवर, रस्त्याच्या कडेला उघड्यावरच खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत. यातील अनेक दुकानांवर स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.
आजाराची लक्षणे
ताप येणे, उलटी, हगवण लागणे ही टायफाईड आजाराची सर्वसाधारण लक्षणे आहेत.
काही रुग्णांमध्ये सात ते आठ दिवसांपर्यंत ताप दिसून येतो.
कधीकधी टायफाईडचा ताप रुग्णाच्या मेंदूपर्यंंत जातो.
टायफाईडमुळे पोटांच्या आतड्यांनाही त्रास होऊ शकतो.
ही घ्यावी काळजी
टायफाईड हा आजार प्रामुख्याने दूषित अन्न, दूषित पाण्याच्या सेवनामुळे होतो. त्यामुळे नागरिकांनी अशा खाद्यपदार्थांचे सेवन टाळावे.
खानपानाचे योग्य नियोजन करून, आरोग्यास लाभदायी असलेल्या पौष्टिक आहाराचेच नागरिकांनी सेवन करावे. तसेच पिण्याचे पाणीदेखील स्वच्छ ठेवावे.
टायफाईडचे रुग्ण कमी झाले आहेत. औषधोपचार चांगल्या दर्जाचा असल्याने रुग्ण सहज बरे हाेत आहेत. असे असले तरी आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेत सकस आहार व नियमित व्यायाम या नियमाचे पालन करावे. - डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, विभाग प्रमुख, मेडिसीन, जीएमसी, अकोला