पॅन कार्ड क्लब गुंतवणूकदारांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 02:55 AM2017-09-11T02:55:33+5:302017-09-11T02:55:40+5:30
सेबीच्या कारवाईत अडकलेली कोट्यवधींची रक्कम काढण्यासाठी पॅन कार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी रविवारी सकाळी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या ‘रामलता’ येथील जनसंपर्क कार्यालयासमोर घंटानाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने खा. धोत्रे यांना निवेदन देऊन गुंतवणूकदारांनी समस्या मांडल्यात. दरम्यान, खासदार संजय धोत्रे यांनी आंदोलकांना आश्वासन दिले. सेबीच्या कारवाईतून गुंतवणूकदारांची तातडीने मोकळीक करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सेबीच्या कारवाईत अडकलेली कोट्यवधींची रक्कम काढण्यासाठी पॅन कार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी रविवारी सकाळी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या ‘रामलता’ येथील जनसंपर्क कार्यालयासमोर घंटानाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने खा. धोत्रे यांना निवेदन देऊन गुंतवणूकदारांनी समस्या मांडल्यात. दरम्यान, खासदार संजय धोत्रे यांनी आंदोलकांना आश्वासन दिले. सेबीच्या कारवाईतून गुंतवणूकदारांची तातडीने मोकळीक करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
राज्यभरातील ४८ खासदारांच्या घर आणि कार्यालयासमोर पॅन कार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी हे आंदोलन केले. राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर को-ऑर्डिनेशन कमिटी आणि लढा वेल्फेर फाउंडेशनच्यावतीने अकोल्यात आंदोलन करण्यात आले. लढा संघटनेचे अध्यक्ष अजय जहागीरदार यांनी शिष्टमंडळासमवेत खा. धोत्रे यांना निवेदन सादर केले. निवेदन देताना पॅन कार्ड क्लबचे मार्केटिंग सदस्य व्ही. बी. वाकोडे ,डॉ. सुरेंद्र पावडे, डी. आर. जाधव , गणेश धुके, अविनाश देशमुख, साहेबराव ठाकरे, व्ही. एच. पवार, पी.पी. उन्हाळे , दिनेश ठाकरे, एस. एम. जोशी, जे. जे. जव्हेरी, देवीदास पोटे, सपना अग्रवाल, नवलखे, मंदा वैराळे , कुलकर्णी, पी.पी. मुळे, एस. पी. शेगोकार, जी. एन. डांगे, आर. बी. पाटील, आर.एस. मुरकर, संतोष पिंजरकर, संजय वानखडे, एम.एम. इस्माइल समवेत तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, जळगाव जामोद व महानगरातील तब्बल दीडशे गुंतवणूकदार प्रामुख्याने उपस्थित होते.
-