पॅन कार्ड क्लब गुंतवणूकदारांचा खासदारांच्या घरासमोर घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:07 AM2017-09-04T02:07:57+5:302017-09-04T02:08:05+5:30

अकोला : सिक्युरिटी अँण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) कारवाईत अडकलेल्या पॅन कार्ड क्लबच्या राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांनी रक्कम मिळविण्यासाठी आता राज्यभरातील खासदारांच्या घरासमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. अकोल्यात हे आंदोलन १0 सप्टेंबर रोजी करण्याचा निर्णय घेतला असून, या आंदोलनात शेकडो गुंतवणूकदार सहभागी होण्याचे संकेत आहेत.

PAN Card Club Members of Parliament House of MPs | पॅन कार्ड क्लब गुंतवणूकदारांचा खासदारांच्या घरासमोर घंटानाद

पॅन कार्ड क्लब गुंतवणूकदारांचा खासदारांच्या घरासमोर घंटानाद

Next
ठळक मुद्देराज्यात एकाच वेळी होणार आंदोलन सेबीच्या कारवाईत अडकली रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सिक्युरिटी अँण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) कारवाईत अडकलेल्या पॅन कार्ड क्लबच्या राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांनी रक्कम मिळविण्यासाठी आता राज्यभरातील खासदारांच्या घरासमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. अकोल्यात हे आंदोलन १0 सप्टेंबर रोजी करण्याचा निर्णय घेतला असून, या आंदोलनात शेकडो गुंतवणूकदार सहभागी होण्याचे संकेत आहेत.
 सुधीर मोरावेकर यांच्या पॅनारामिक ग्रुप ऑफ कंपनीने गुंतवणूकदारांची साखळी तयार करून हॉटेल, रिसोर्ट सेवा देत राज्य, देश आणि विदेशातून ६0 हजार कोटींची गुंतवणूक केली. दरम्यान, गुंतवणुकीवर सेबीने आक्षेप घेतल्यामुळे गुंतवणूकदारांची कोट्यवधींची रक्कम अडकली. त्यात राज्यातील ३५ लाख गुंतवणूदार अडकले. सर्वसामान्य माणसाची रक्कम अडकल्याने राज्यभरातून ओरड सुरू झाली. दरम्यान, सेबीला अल्टिमेटम देण्यात आले. सेबीकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर राज्यभरातील गुंतवणूकदार आणि पदाधिकार्‍यांनी खासदारांच्या घरासमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. विदर्भातील गुंतवणूकदारांचे दोनशे कोटी रुपये पॅन कार्डमध्ये गुंतले असून, २0 ऑगस्ट रोजी पुण्यात ऑल इंडिया इन्व्हेस्टर्स अँक्शन कमिटीच्या सभेत आंदोलनाची दिशा ठरविली गेली. अमरावती येथील लढा वेल्फेअर फाउंडेशन अमरावतीची संघटनादेखील यामध्ये सहभागी आहे. विदर्भातील आंदोलन गजानन तेटू यांच्या नेतृत्वात छेडले जाणार आहे. दरम्यान, या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून पोलीस प्रशासन आणि अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या गुंतवणूकदारांसोबत सहानुभूती दाखविली असून, आता पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title: PAN Card Club Members of Parliament House of MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.