‘पॅनकार्ड क्लब’च्या मालमत्तांच्या विक्री प्रक्रियेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:18 AM2017-11-24T00:18:43+5:302017-11-24T00:26:23+5:30

अकोला : गत काही वर्षांपासून वादात सापडलेल्या पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी घटना घडत आहे. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने वादात सापडलेल्या आणि गोठविलेल्या कंपनीच्या स्थावर मालमत्तांच्या विक्री प्रक्रियेला हात घातला आहे.

'PAN Card Club' starts selling process of assets | ‘पॅनकार्ड क्लब’च्या मालमत्तांच्या विक्री प्रक्रियेस प्रारंभ

‘पॅनकार्ड क्लब’च्या मालमत्तांच्या विक्री प्रक्रियेस प्रारंभ

Next
ठळक मुद्दे‘सेबी’ने काढल्यात नोटीसेस गुंतवणूकदारांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गत काही वर्षांपासून वादात सापडलेल्या पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी घटना घडत आहे. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने वादात सापडलेल्या आणि गोठविलेल्या कंपनीच्या स्थावर मालमत्तांच्या विक्री प्रक्रियेला हात घातला आहे. स्थावर संपत्तीबाबत जाहीर सूचना देत, संपत्तीची किंमत आणि ठिकाण जाहीर करीत लिलावाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये गुंतविलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
देश आणि  देशाबाहेरील गुंतवणूकदारांना आमिष दाखवून पॅनकार्ड क्लबने कोट्यवधींची रक्कम गोळी केली. गुंतवणूकदारांचा डोलारा देशभरात विस्तारित होत असताना सेबीने कारवाई केल्याने गत काही वर्षांपासून गुंतवणूकदारांची  रक्कम अडकून पडली आहे. सेबीने तातडीने कारवाई करून गुंतवणूकदारांना न्याय द्यावा म्हणून ठिकठिकाणी आंदोलने झालीत. 
खासदारांना घेराव टाकून देशाचे वित्त मंत्री अरूण जेटली यांच्यापर्यंत हे प्रकरण  गेले. त्यानंतर सेबीला निर्देश देत गुंतवणूकदारांची रक्कम तातडीने मोकळी करण्याचे सांगितले गेले. सेबीला निर्देश मिळताच देशभरातील पॅनकार्ड क्लबच्या संपत्तीच्या विक्री प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. 
त्याची सुरुवात नोटीसेसपासून झाली असून, संपत्तीचे विवरण आणि किंमत जाहीर केली गेली आहे. आता ठिकठिकणाच्या संपत्तीचा लिलाव करून, त्या रकमेतून गुंतवणूकदारांची रक्कम दिली जाणार आहे.  पॅनकार्ड क्लब लिमिटेड आणि इतर, परसरामपुरिया  प्लान्टेशन्स लिमिटेड, श्री साई स्पेस क्रियेशन लिमिटेड आणि त्यांचे संचालकांची संपत्ती आता लवकरच सेबी विक्री करणार आहे. त्यामुळे गत अनेक वर्षांपासून गोठविल्या गेलेली पॅनकार्ड क्लबमधील रक्कम त्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा  झाला आहे. 

Web Title: 'PAN Card Club' starts selling process of assets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.