पंचायत समिती कार्यालयात चोरी!
By admin | Published: March 20, 2017 02:37 AM2017-03-20T02:37:55+5:302017-03-20T02:37:55+5:30
बाळापूर येथील घटना; १ लाख २0 हजार रुपये किमतीच्या विविध वस्तू लंपास.
बाळापूर, दि. १९- बाळापूर पंचायत समिती अंतर्गत विविध योजनांच्या लाभार्थींना वितरित करण्यासाठी उपलब्ध झालेल्या १ लाख २0 हजार रुपये किमतीच्या विविध वस्तू गोदाम व योग्य सुरक्षेअभावी चोरीस गेल्याची घटना १७ मार्चपूर्वी घडली. याबाबत बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार नोंदवूनही अद्यापपर्यंत कसलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
बाळापूर पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या लाभाथर्र्ींंची निवड झाल्यावर त्या लाभाथर्र्ींना विविध वस्तू अथवा साहित्याचे वाटप करण्यात येते. सदर वस्तू वा साहित्य ठेवण्यासाठी पंचायत समितीकडे गोदामाची व्यवस्था नाही. त्यामुळे सदर सर्व साहित्य सर्व कार्यालयातील बंद असलेल्या खोल्यात, माहिती केंद्रात ठेवले जाते. लाभार्थी आल्यास त्या साहित्याची पोच घेऊन साहित्य दिले जाते. समाजकल्याण विभागाचे १0 विद्युत पंप, १२ सोलर दिवे, असे १ लाख २0 हजार रुपयांचे साहित्य १७ मार्चपूर्वी कधीतरी कार्यालयावरील टिन तोडून चोरून नेल्याची बाब १७ मार्च रोजी कृषी विभागाच्या कर्मचार्याच्या लक्षात आली. त्यादिवशी लाभार्थींंना साहित्याचे वितरण करताना साहित्य चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यानंतर गट विकास अधिकारी वाय.डी. शिंदे यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला लेखी फिर्याद दिली. अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही.
लाभाथर्र्ींंना वाटप करण्याचे साहित्य ठेवण्यासाठी गोदाम नाही. तसेच पंचायत समितीमधील कार्यालयात रात्रीची सुरक्षा व्यवस्था नाही. पुरातत्त्व विभागाच्या ताब्यातील किल्ला परिसरात तालुका स्तरावरील सर्व प्रशासकीय कार्यालये आहेत. प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्यांची निवासस्थाने व कोषागार कार्यालय आहे. परंतु तेथे कुठलाही अधिकारी व कर्मचारी राहत नाही. तसेच कार्यालयाच्या सुरक्षेसाठी रात्रीचे पहारेकरी नसल्याने कार्यालयीन साहित्य चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. तरीही कुठलीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. लाभवस्तू चोरीस गेल्यामुळे आता संबंधित लाभार्थींना त्या लाभ वस्तूंपासून वंचित राहावे लागणार आहे.