पंचायत समिती प्रवेशद्वार बांधकामाच्या देयकात गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:44 PM2019-06-05T12:44:57+5:302019-06-05T12:45:04+5:30

पंचायत समितीच्या प्रवेशद्वार क्रमांक २ साठी सुधारित अंदाजपत्रकानुसार ३ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आला.

Panchayat Samiti entrance gate deal payment fraud | पंचायत समिती प्रवेशद्वार बांधकामाच्या देयकात गैरव्यवहार

पंचायत समिती प्रवेशद्वार बांधकामाच्या देयकात गैरव्यवहार

Next

अकोला: अकोलापंचायत समितीच्या प्रवेशद्वारासाठी नियमबाह्यपणे निधी खर्च केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी, लेखाधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंत्यांची खातेचौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन पंचायत समिती सदस्य श्रीकांत ढोमणे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.
पंचायत समितीच्या प्रवेशद्वार क्रमांक २ साठी सुधारित अंदाजपत्रकानुसार ३ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आला. तो नियमबाह्य असून, खर्चात अनियमितता झाली आहे. त्यामध्ये ११ डिसेंबर २०१८ रोजीच्या सभेत प्रशासकीय मान्यतेचा ठराव ठेवण्यात आला. ती मान्यता २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी घेण्यात आली. प्रत्यक्षात आर्थिक वर्ष २०१८-१९ सुरू असताना हा प्रकार कसा झाला, उपकरातील काम असल्याने खर्चासाठी चालू वर्षात मंजुरी आवश्यक आहे. चौकशी अहवालात शाखा अभियंत्यांनी मोजमाप पुस्तिकेत मापाची नोंद कधी केली. त्यावर स्वाक्षरी, दिनांकाची नोंद नाही. अनेक मुद्दे कोरे ठेवण्यात आले. पाहणी अहवाल साक्षांकित करून दिलेला नाही. सुधारित अंदाजपत्रकासाठी उपअभियंत्याचे पत्रही घेतले नाही. उपकरातून काम करण्यासाठी इतर निधी खर्चातून ते काम यापूर्वी झाले नाही, असे उपअभियंत्यांचे पत्र न घेताच मंजुरी घेण्यात आली. विशेष म्हणजे, सुधारित अंदाजपत्रकाला १९ नोव्हेंबर २०१८ रोजी तांत्रिक मान्यता घेण्यात आली. त्यापूर्वीच काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्रही उपविभागातून देण्यात आले. त्यामुळे एकूणच निधी हडप करण्यासाठी हा प्रकार संगनमताने करण्यात आला. जबाबदार संबंधित अधिकाºयांची खातेचौकशी करून कारवाई करावी, असे निवेनदनात म्हटले आहे.

 

Web Title: Panchayat Samiti entrance gate deal payment fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.