पंचायत समितीचे गटनेत्यांनी घेतला पाणीटंचाई व घरकुलांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:19 AM2021-03-05T04:19:24+5:302021-03-05T04:19:24+5:30
भंडारज बु. गावातील पंतप्रधान आवास योजनेच्या रखडलेल्या १५ घरकुलांचा आढावा घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याची सूचना देण्यात आली तसेच ...
भंडारज बु. गावातील पंतप्रधान आवास योजनेच्या रखडलेल्या १५ घरकुलांचा आढावा घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याची सूचना देण्यात आली तसेच रखडलेले रमाई आवास योजनेचे ८ घरकुले सुद्धा तात्काळ मंजूर करून कारवाई करण्याची सूचना यावेळी देण्यात आली. यासोबत विद्युत वितरणच्या शिकस्त तारा आणि विद्युत बिल दुरुस्त करून देण्यात आल्या. यासोबत ग्रामपंचायतीने गोरगरिबांना त्रास न होऊ देता नमुना ८ घेऊन ग्रामपंचायतमध्ये नोंदीच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या.पाणीटंचाईचा आढावा घेताना, जल जीवन मिशन अंतर्गत आराखड्यामध्ये मंजूर झालेली विहीर, टाकी यांची पाहणी करण्यात आली. सदरची योजना आणण्यासाठी आमदार नितीन देशमुख व पातूर पंचायत समितीचे गटनेते अजय ढोणे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन समस्या मार्गी लावली. त्यामुळे लवकरच शिर्ला आणि भंडारज गावाला पाण्याचा पुरवठा करण्यासंबंधीचे नियोजन करण्यात आले.