पांढुर्णा गट ग्रामपंचायतचे प्रथमच सरपंच पद एससीसाठी राखीव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:45 AM2020-12-11T04:45:48+5:302020-12-11T04:45:48+5:30
स्वातंत्र्य काळापासून गट ग्रामपंचायत पांढुर्णा व सोनुना येथील सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव नव्हते. प्रथमच येथील सरपंच पद एससीसाठी ...
स्वातंत्र्य काळापासून गट ग्रामपंचायत पांढुर्णा व सोनुना येथील सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव नव्हते. प्रथमच येथील सरपंच पद एससीसाठी राखीव झाले आहे.
पातूर पंचायत समितीमध्ये ८ डिसेंबर रोजी तहसीलदार दीपक बाजड यांच्या नेतृत्वाखाली पातूर तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये गट पांढुर्णा सोनुना ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रथमच अनुसूचित जातीसाठी आरक्षण निघाले. त्यामुळे अनेकांच्या आशेवर पाणी फेरले आहे. अगोदर सर्वसाधारण गटामधून सरपंच निवडून यायचा. गावातील ठरावीक मंडळीच निवडून यायची; मात्र यावेळेस परिस्थिती बदलली आहे. एससी प्रवर्गाचे आरक्षण निघाल्यामुळे आता गावातील अनुसूचित जातीची व्यक्ती गावाची सरपंच होणार आहे. गावात अनुसूचित जातीची संख्या कमी आहे. असे असतानाही प्रथमच समाजाला प्रतिनिधित्व मिळणार असल्याने, काही जणांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. गट ग्रामपंचायत पांढुर्णा व सोनुना येथील ग्रामपंचायतची सदस्य संख्या ९ आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीचा एक सदस्य असायचा. आता मात्र अनुसूचित जातीला प्रथमच सरपंच पदाची संधी लाभणार आहे. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.